परळीत करुणा शर्मा यांच्याविरोधात कटकारस्थान… माजी मंत्री राम शिंदेंचा आरोप

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परळीत करुणा शर्मा यांच्याविरोधात कटकारस्थान… माजी मंत्री राम शिंदेंचा आरोप

प्रतिनिधी : अहमदनगरपरळीत आलेल्या करुणा शर्मा यांच्याबाबतीत जे काही घडले, त्यावरून त्यांच्याविरूद्ध कटकारस्थान रचल्याचे दिसून येत आहे अशा प्रकारे ज

शिक्षकांच्या अनुकंपासह पायाभूत वाढीव पदांचा प्रश्न मार्गी लागणार
साखर सम्राटांपुढे निलेश लंकेंचे लोकसभेला आवाहन l Nilesh lanke l LokNews24
सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्याय थांबवा : अजित पवार l DAINIK LOKMNTHAN

प्रतिनिधी : अहमदनगर
परळीत आलेल्या करुणा शर्मा यांच्याबाबतीत जे काही घडले, त्यावरून त्यांच्याविरूद्ध कटकारस्थान रचल्याचे दिसून येत आहे

अशा प्रकारे जर राज्यातील एखाद्या मंत्र्याकडूनच कोणावर अन्याय करण्याची भूमिका दिसून येत असेल तर त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे.

प्रसारमाध्यमांतून घटनेच्यावेळचे जे व्हिडिओ समोर आले आहेत, त्यावरून हे मोठे कारस्थान असल्याचे दिसते, असा आरोप भाजपचे माजी मंत्री शिंदे यांनी केला.

राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळलेली आहे. केंद्रीय मंत्र्याला तात्काळ अटक केली जाते. गुन्हा घडला महाडमध्ये, दाखल केला नाशिकमध्ये आणि स्थानबद्ध केले रत्नागिरीत.

केंद्रीय मंत्र्याला अशा पद्धतीने अटक केली जाते आणि आता माजी गृहमंत्र्याविरुद्ध लूक आऊटची नोटीस जारी होऊनही माजी गृहमंत्री सापडत नाही, हे पटत नाही.

खरे तर त्यांनी स्वत: होऊन तपास यंत्रणेसमोर यायला हवे. पाच नोटीसा जाऊनही ते हजर होत नाहीत. भीती वाटत असल्याने ते अटक टाळत असावेत, असा टोला भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी लगावला आहे.

COMMENTS