मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ होतांना दिसून येत आहे. परमबीर सिंह यांच्याविरोधात करण्यात आलेल्या भ्रष्टाचारांच्या त
मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ होतांना दिसून येत आहे. परमबीर सिंह यांच्याविरोधात करण्यात आलेल्या भ्रष्टाचारांच्या तक्रारींवरून राज्य शासनाने त्यांच्या खुल्या चौकशीची परवानगी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) दिली असतानाच मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात एका बांधकाम व्यावसायिकाच्या तक्रारीवरून माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह 8 जणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे येथील एका बांधकाम व्यावसायिकाच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात परमबीर सिंह यांच्यासह डीसीपी अकबर पठाण, पोलीस अधिकारी श्रीकांत शिंदे, पीआय आशा कोरके, नंदकुमार गोपाळे, संजय पाटील, खासगी इसम सुनील जैन, आणि संजय पुनमिया यांच्याविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात जैन आणि पुनामिया यांना अटक करण्यात आली आहे.
केस मागे घेण्यासाठी बिल्डरकडून खंडणी मागितल्याची आरोप परमबीर सिंग, अकबर पठाण यांच्यासह वरिष्ठ पोलिसांवर आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांच्यापाठोपाठ आता अधिकार्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. संजय पुनमिया आणि सुनील जैन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हे दोघे परमबीर यांच्यासाठी खंडणी उकळायचे, असा आरोप आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिमहिना 100 कोटींची वसुली करण्याचे आदेश दिल्याचा आरोप करणारे पत्र मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिले होते. देशमुख किंवा त्यांच्या कार्यालयातील कोणत्याही अधिकार्याकडून कोणतेही गैरवर्तन किंवा गुन्हा झाल्याबाबत ही समिती चौकशी करणार आहे.
COMMENTS