परमबीर यांना नऊ तारखेपर्यंत अटक न करण्याचे आदेश

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परमबीर यांना नऊ तारखेपर्यंत अटक न करण्याचे आदेश

मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना पोलिस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी दाखल केलेल्या एफआयआर प्रकरणात अटकेपासून दिलासा दिला आहे.

नागरिकांच्या आरोग्याचे हित जपले जाईल : मुख्यमंत्री
समृद्धी महामार्गाला वर्षभरातच पडल्या भेगा
Ahmednagar : नगरमध्ये मंदिरातील पुजारीच फैलावतात कोरोना (Video)

मुंबई / प्रतिनिधीः मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना पोलिस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी दाखल केलेल्या एफआयआर प्रकरणात अटकेपासून दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी नऊ जूनपर्यंत पुढे ढकलली आहे. उन्हाळी सुट्टीनंतर नियमीत खंडपीठासमोर यावर सुनावणी होणार आहे.

     अकोल्यामध्ये परमबीर यांच्या विरोधात एप्रिल महिन्यात भ्रष्टाचाराच्या आरोपात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. घाडगे यांनी ही एफआयआर दाखल केलेली आहे. परमबीर यांच्यासह 26 पोलिस अधिकार्‍यांचे या एफआयआरमध्ये नावे आहेत. या सर्वांवर गुन्हेगारी षडयंत्र रचणे, पुरावे नष्ट करणे आणि एससी-एसटी अ‍ॅक्ट अंतर्गत केस दाखल केली गेली होती. घाडगे यांनी आरोप केला आहे, की परमबीर जेव्हा ठाणे पोलिसात होते, तेव्हा त्यांच्याकडून लाच मागण्यात आली होती. घाडगे यांनी असे म्हटले आहे, की याप्रकरणी त्यांनी तेव्हाही तक्रार केली होती; मात्र काहीच सुनावणी झाली नाही. परमबीर 2015 पासून 2018 पर्यंत ठाणे पोलिस आयुक्त होते. घाडगे यांनी म्हटले आहे, की परमबीर यांनी त्यांना गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या आरोपींविरोधात अनेकदा आरोपपत्र दाखल न करण्यासही सांगितले आहे.

COMMENTS