परभणीच्या बाल वैज्ञानिकांनी केले पेलोड सॅटेलाइटचे यशस्वी प्रक्षेपण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परभणीच्या बाल वैज्ञानिकांनी केले पेलोड सॅटेलाइटचे यशस्वी प्रक्षेपण

प्रतिनिधी परभणी एशियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स रिसर्च अँड एज्युकेशन आणि परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी तसेच क्रिएटिव्ह एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्

राज्यात 108 रुग्णवाहिकांची संख्या दुपटीने वाढणार
पावसाने ओढ दिल्यास विज निर्मितीसाठीचे पाणी पिण्यासह सिंचनास देण्याचा विचार : ना. शंभूराज देसाई
तांबवे येथील डॉ. शलाका पाटील यांना पीचडी

प्रतिनिधी परभणी

एशियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स रिसर्च अँड एज्युकेशन आणि परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी तसेच क्रिएटिव्ह एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सॅटेलाइट लॉन्चिंग हा अभिनव उपक्रम परभणी पासून जवळच असलेल्या भोसा इंद्रायणी माळावरून करण्यात आला. जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांमधून आलेले उत्साही पालक व विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात यात समावेश होता. सॅटेलाइट लॉन्चिंग हा अभिनव उपक्रम परभणी वेगवेगळ्या शाळेतील इग्नायटेड माईड्स ग्रूपने इंद्रायणी माळ येथून दिनांक 31 10. 2021 रोजी यशस्वीपणे प्रक्षेपित केले. 

परभणी कर बाल वैज्ञानिकांनी केलेला हा पर्यावरण अभ्यासासाठी उपयुक्त, उपग्रह जेव्हा अवकाशात झेपावला तेव्हा उपस्थितांनी “जय जवान जय किसान व जय विज्ञान” हा जयघोष करून बालवैज्ञानिक आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे कौतुक केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. यांना शुभेच्छा दिल्या. 

  या कार्यक्रमास परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ.रामेश्वर नाईक, एशियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन (आयसर) परभणीचे अध्यक्ष डॉ.सुनील मोडक, प्रमुख पाहुणे – वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.धीरज कुमार कदम, हवामानशास्त्र विभाग प्रमुख डॉ.कैलास डाखोरे ,  डॉ.जगदीश नाईक, डॉ. विठ्ठल सिसोदिया, प्रा. डॉ  गोपाल शिंदे, कैलास सुळसुळे यांचा समावेश होता. प्रास्ताविक आईसरचे सचिव प्रसन्न भावसार यांनी केले. सॅटेलाईट मोहिमेची संपूर्ण माहिती टीम लीडर उर्जित भावसार यानी दिली. या टीममधील उर्वरित सदस्य पार्थ ज्ञानोबा दराडे ,हर्षद दीपक शिंदे, नीव महेश कांकरिया, सारा रोहिदास नितोंडे, इंद्रायणी किरण सोनटक्के वेदिका अमिताभ कडतन, राशी तापडिया या बाल वैज्ञानिकांनी हा पेलोड उपग्रह  तयार केला केला 

होता. सुत्रसंचलन महेश शेवाळकर तर आभार कैलास सुरवसे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती सदस्य दत्ता जाधव,

आयसरचे सचीव प्रसन्न भावसार,दीपक शिंदे,परभणी अस्ट्रोनिमिकल सोसायटीचे सचिव सुधीर सोनुनकर, गजानन पांचाळ, माणिक गोरे,जिजा  जाधव ,पी आर पाटील डॉ. विजय नरवाडे ,वेदप्रकाश आर्या डॉ. रणजीत लाड, प्रसाद वाघमारे, अशोक लाड, अशोक शिरगदवार,अनिल पटवे, कृष्णा  जावळे संगीतकार महेश काटे, आदींनी अथक परिश्रम घेतले

COMMENTS