Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पन्नास लाखांच्या लाचेत महिला न्यायाधीश अटकेत

न्यायाधीशाला मॅनेज करून तुमची केस रद्द करायला लावते, असे सांगून ५० लाख रुपयांची लाच प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने महिला न्यायाधीशाला अटक केली.

लोहा तालुक्यातील वादळी वार्‍यासह गारपीट
औसा येथे कृषीमंत्र्यांच्या प्रतिमेस काद्यांचा हार अर्पण
राज ठाकरेंच्या नावाने खंडणीची मागणी; फिल्म इंडस्ट्रीतील तिघांना बेड्या

पुणे/प्रतिनिधी : न्यायाधीशाला मॅनेज करून तुमची केस रद्द करायला लावते, असे सांगून ५० लाख रुपयांची लाच प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने महिला न्यायाधीशाला अटक केली. अर्चना दीपक जतकर (रा. मावळ) असे अटक केलेल्या महिला न्यायाधीशाचे नाव आहे. न्यायालयाने जतकर यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली आहे. 

या प्रकरणात यापूर्वीच निलंबित पोलिस निरीक्षक अनिल ऊर्फ भानुदास जाधव याला अटक केली आहे़, तर लाच घेताना जानेवारीमध्ये खासगी महिला शुभावरी भालचंद्र गायकवाड (वय २९) हिला लाचलुचपत प्रबिबंधक विभागाने ५० हजारांची लाच घेताना अटक केली होती. त्यानंतर या गुन्ह्यात महिला न्यायाधीश यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने अर्चनाला अटक करण्यात आली आहे. अर्चना जतकर-शुभावरी गायकवाड यांच्यात तब्बल १४७ वेळा संपर्क करून संभाषण केले आहे. गायकवाड यांनी फिर्यादी यांच्याविरुद्धच्या केसमध्ये त्यांच्या बाजूने काम करून देते, असे म्हणाल्याचे निष्पन्न झाले असून त्यांचे सभाषण व्हाईस रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड झालेले आहे. गायकवाड हिने फिर्यादीप्रमाणेच आणखी ७ ते ८ जणांना जागेच्या वादासंदर्भात न्यायालयातून निकाल लावून देते, असे म्हणून संपर्क केल्याचे निष्पन्न झाले आहे. हे सर्व जमिनीच्या संदर्भातील वाद जतकर यांच्या न्यायालयामध्येच सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे. न्यायाधीश जतकर यांनी आरोपीसोबत संपर्क साधण्यासाठी वापरलेले सीमकार्ड हे मुंबईतील समता कुबडे यांच्या नावावर आहे. त्यांनी जतकर यांना दोन सीमकार्ड दिले आहेत, दुसरे सीमकार्ड जतकर यांनी कोणाला दिले याचा तपास करायचा आहे. जतकर यांनी गुन्ह्यातील इतर आरोपी भानुदास जाधव याला एकूण १८ कॉल केले असून सुशांत केंजळे याला चार कॉल केल्याचे निष्पन्न झाले आहे. जतकर व इतर आरोपी यांनी यापूर्वी कट रचून आणखी काही गुन्हे केले आहेत काय, याचा तपास करायचे असल्याचे सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी सहा दिवस पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने पाच एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली. सहायक पोलिस आयुक्त सीमा मेहेंदळे अधिक तपास करीत आहेत. अर्चना जतकर यांनी अटकपूर्व जामीन मिळविण्याचा प्रयत्न केला होता; परंतु त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने आदेशानुसार अर्चना जतकर या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आज सकाळी शरण आल्या़. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले.

COMMENTS