नेवासाफाटा प्रतिनिधी - नेवासा तालुक्यातील कुकाणा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी कुकाण्यातील युवा नेतृत्व पत्रकार
नेवासाफाटा प्रतिनिधी –
नेवासा तालुक्यातील कुकाणा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी कुकाण्यातील युवा नेतृत्व पत्रकार सोमनाथ कचरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली, तर उपाध्यक्ष पदी प्राप्ती सचिन बोरुडे यांची निवड जिल्हा परिषद शाळा कुकाणा येथे झालेल्या निवड समितीच्या कार्यक्रमात करण्यात आली.तसेच माता पालक संघाच्या उपाध्यक्ष पदी सुरेखा शरद दरंदले तर शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्ष पदी सचिन वसंत गोर्डे यांची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच दौलतराव देशमुख हें होते तर व्यासपीठावर माजी सरपंच एकनाथराव कावरे, शालेय व्यवस्थापणचे मावळते अध्यक्ष कैलास म्हस्के युवा नेते अमोल अभंग मुख्यध्यापक सुनील जाधव ग्रामपंचायत सदस्य सुनील गोर्डे, रज्जाक इनामदार, कारभारी गोर्डे माजी उपसरपंच भाऊसाहेब फोलाने, उपस्थितीत होते.
प्रसंगी नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा सत्कार मावळते अध्यक्ष कैलास म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी नूतन अध्यक्ष सोमनाथ कचरे यांनी आपल्या मनोगतात म्हटले सर्वं पालकांना व शिक्षकांना सोबत घेऊन शाळेचा व शिक्षणाचा स्तर उंचवण्यासाठी तसेच शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.
या कार्यक्रमा प्रसंगी पत्रकार इस्माईल शेख, चंद्रकांत कचरे, उमेश सदावर्ते, सचिन बोरुडे, यांच्यासह पालक उपस्थित होते.
तसेच व्यवस्थापन समितीत सदस्यपदी एकनाथराव कावरे (प्राधिकरण सदस्य ), रज्जाक इनामदार( शिक्षणतज्ञ्), देविदास गरड, अरुण फोलाने, राजश्री शिंदे, शबाना बागवान,मनीषा लोंढे,निशा गोर्डे, पूनम मानकेश्वर, रोहिणी म्हस्के, वैशाली भूमकर, सीमा सोनवणे (शिक्षक प्रतिनिधी )सुनील जाधव (सचिव मुख्याध्यापक ) यांची वर्णी लागली आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्यध्यापक सुनील जाधव यांनी केले तर आभार कैलास म्हस्के सर यांनी मानले.
या निवडीचे स्वागत सरपंच लताताई अभंग उपसरपंच शुभांगीताई कचरे तसेच ग्रामपंचायत सदस्य मंडळाच्या व पालकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
COMMENTS