Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पत्रकार रोहिदास दातीर यांचे अपहरण करून हत्या

राहुरी येथील दक्ष पत्रकार संघाचे संपादक रोहिदास दातीर यांचे काल मंगळवारी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान राहुरी तालुक्यातील मल्हार वाडी रोड वरून घरी स्कुटी वरून जात असताना एका स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या अज्ञात लोकांनी अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या केल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे.

नवस फेडण्यासाठी चक्क भाविक चालतात विस्तवावरून.
संगमनेरात तब्बल सात तास चालली शिवजयंती मिरवणूक
नगरमध्ये पहाटेच्या अजानच्या वेळेस भोंगे शांतच…

अहमदनगर/प्रतिनिधी : राहुरी येथील दक्ष पत्रकार संघाचे संपादक रोहिदास दातीर यांचे काल मंगळवारी  दुपारी बारा वाजेच्या दरम्यान राहुरी तालुक्यातील मल्हार वाडी रोड वरून घरी स्कुटी वरून जात असताना एका स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या अज्ञात लोकांनी अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या केल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. 

राहुरी येथील दक्ष पत्रकार संघाचे संपादक रोहिदास दातीर हे समाजातील दृष्ट प्रवृत्ती विरुद्ध सतत कार्यरत गोरगरिबांसाठी धडपडणारी आणि अन्यायाविरुद्ध आवाज उचलणारा अवलिया व्यक्तीमत्व आज आपल्यातून निघून गेल्याचे दुःख होत आहे. श्रीरामपुर मधील व्यापारी हिरेन यांची हत्या झाल्यानंतर आता पत्रकार दातीर यांची हत्या करण्यात आली आहे. अपहरण करून हत्या करण्याच्या सलग दोन घटना राहुरी तालुक्यात घडल्या आहेत. 

दातीर यांचे काल दुपारी अपहरण झाले होते. रात्री उशिरा कॉलेज रोड परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. पत्रकार दातीर मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास राहुरी शहरातील मल्हारवाडी रोडने आपल्या दुचाकीवरून घरी जात होते. सातपीर बाबा दर्गाजवळून जात असताना एका चार चाकी वाहनातून आलेल्या लोकांनी त्यांना मारहाण करून गाडीत बसविले आणि निघून गेले. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तेथे धाव घेतली. दातीर यांची दुचाकी आणि पायतील चप्पल घटनास्थळीच आढळून आली. दातीर यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो बंद होता. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध मोहीम हाती घेतली. सीसीटीव्ही आणि प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अपहरणासाठी वापरण्यात आलेल्या वाहनाचा तपास लागला. पोलिसांनी ते ताब्यात घेतले. मात्र, आरोपी मिळाले नाहीत. आरोपी एका राजकीय पक्षाशी संबंधीत असल्याची माहिती पुढे आली आहे.

COMMENTS