पतीचे कोरोनामुळे निधन झाल्याची माहिती मिळताच पत्नीने आपल्या तीन वर्षांच्या मुलासह आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे.
नांदेड/प्रतिनिधीः पतीचे कोरोनामुळे निधन झाल्याची माहिती मिळताच पत्नीने आपल्या तीन वर्षांच्या मुलासह आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे. नांदेडच्या लोह शहरात ही घटना घडली आहे. महिलेने दोन्ही मुलींना घरी ठेवून तीन वर्षांच्या मुलासह तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. आईवडीलांविना मुली पोरक्या झाल्या आहेत.
पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की शंकर गदम (40) मूळ आंध्र प्रदेशातील होते. गदाम हे लोहा शहरातील बालाजी मंदिराच्या पाठीमागे पत्नी दोन मुली व एका मुलासह राहत होते. त्यांचा कोरोना अहवाल मंगळवारी होकारात्मक आल्यानंतर त्यांच्यावर लोहा येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शंकर गदम यांचा मुत्यू झाला. ही घटना समजल्यानंतर त्यांच्या पत्नीला मोठा धक्का बसला. मंगळवारी मध्यरात्री लहान मुलाला सोबत घेऊन त्यांनी शहराजवळ असलेल्या सुनेगाव तलावात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी लोहा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS