पंतप्रधान मोदींना पाठवल्या नगरमधून शेणाच्या गोवर्‍या

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंतप्रधान मोदींना पाठवल्या नगरमधून शेणाच्या गोवर्‍या

अहमदनगर/प्रतिनिधी- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गॅस दरवाढ कमी करण्याच्या मागणीसाठी चक्क शेणाच्या गोवर्‍या कुरियरद्वारे दिल्लीला पाठविण्यात आल्

विद्यार्थ्यांना थेट शाळेतच एसटी पासचे वाटप
बनावट ‘एसएमएस’ला प्रतिसाद देऊ नये ; महावितरणचे आवाहन
अन्यथा गढूळ पाणी मुख्याधिकारी यांना पिण्यास भाग पाडू – दत्ता काले

अहमदनगर/प्रतिनिधी- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गॅस दरवाढ कमी करण्याच्या मागणीसाठी चक्क शेणाच्या गोवर्‍या कुरियरद्वारे दिल्लीला पाठविण्यात आल्या आहेत. अहमदनगर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्यावतीने हे अभिनव आंदोलन करताना गॅस दरवाढ कमी करण्याच्या मागणीचे निवेदन हिंदीतून त्यांना पाठवले व त्यात, 15 लाख रुपये पाठवण्याची देखील आठवण करून दिली.
शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली सेवादल महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष कौसर खान, सुमन कालापहाड, शारदा वाघमारे, उषा भगत, माजी नगरसेविका जरीना पठाण, हेमलता घाटगे, रजनी भोसले, गीता लक्ष्मण, रिजवाना पटेल, कविता लोडगे, मुक्ता डहाळे आदी महिला पदाधिकार्‍यांनी मोदींना पाठविण्यात आलेल्या शेणाच्या गोवर्‍या हातात धरून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली व निवासी उपजिल्हाधिकार्‍यांमार्फत पंतप्रधानांना हिंदीतून निवेदन पाठविले.
विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष संध्याताई नवालाखे यांच्या आदेशावरून नगर शहरात शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष काळे यांच्यासह संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, आंदोलनासाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्रभारी व जिल्हा परिषदेच्या माजी सभापती अनुराधाताई नागवडे, प्रदेश महिला महासचिव उत्कर्षाताई रुपवते यांच्या मार्गदर्शनाखाली नगर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्यावतीने गॅस दरवाढीच्या विरोधात मोहीम राबवली जात आहे. त्याअंतर्गत पंतप्रधानांना शेणार्‍या गोवर्‍या व हिंदीतून निवेदन पाठवण्याचे आंदोलन करण्यात आले.
मोदींना पाठविलेल्या हिंदी निवेदनामध्ये म्हटले आहे की, देशात इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच गॅस दर प्रचंड वाढले असून गगनाला भिडले आहेत. कोरोना महामारीमुळे प्रत्येक कुटुंबाचे मासिक उत्पन्न घटले आहे. अनेक आप्तेष्टांना, जवळच्यांना आम्ही या महामारीत गमावले आहे. एका बाजूला हे दुःख आणि आर्थिक संकट असताना दुसर्‍या बाजूला केंद्र सरकारने गॅसच्या दरांमध्ये भरमसाठ वाढ केल्यामुळे महिला वर्गाचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे परमेश्‍वर केंद्र सरकारला गॅसची दरवाढ तातडीने कमी करण्याची सदबुद्धी देवो, असेही या निवेदनात म्हटले आहे. भारतीय जनता पक्ष सत्तेत नसताना थोडी जरी गॅस दरवाढ झाली तर त्या पक्षाचे नेते, महिला, कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरत जोरदार निदर्शने, आंदोलन करायचे. आता तर देशात भाजपची सत्ता आहे. तरीसुद्धा भाववाढ होतच आहे. पण त्यावेळी आंदोलन करणारे भाजपचे कार्यकर्ते आता कुठे गायब झाले आहेत? असा सवाल या निवेदनामध्ये उपस्थित केला आहे.

पंधरा लाख रुपयांची दिली आठवण
या निवेदनाच्या शेवटी महत्त्वपूर्ण विनंती असे म्हणत पंतप्रधानांना 2014 च्या निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी केलेल्या पंधरा लाख रुपयांच्या वायद्याची आठवण करून दिली गेली आहे. मोदी सरकार सत्तेत येऊन जवळपास सात वर्षे उलटली तरी देखील आमच्या खात्यावर पंधरा लाख रुपये आपण वचन दिल्याप्रमाणे अद्यापही जमा झालेले नाहीत. तेवढे तात्काळ पाठवून द्यावेत, असे नमूद करत मोदी सरकारला त्यांनी केलेल्या चुनावी जुमल्याची आठवण महिला काँग्रेसने करून दिली आहे.

उपरोधिक आंदोलनाची चर्चा
गॅस दरवाढीच्या विरोधात पंतप्रधानांना शेणार्‍या गोवर्‍या कुरियरने पाठवण्यासह हिंदी निवेदन पाठवण्याच्या उपरोधिक आंदोलनाची सोशल मिडियात चर्चा रंगली आहे. निवेदनामध्ये पंतप्रधानांना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो अशी ईश्‍वरचरणी प्रार्थना करीत असल्याचे म्हटले असून पत्राच्या शेवटी आपले नम्र म्हणून गॅस दरवाढीमुळे देशातील समस्त त्रस्त महिला असे नमूद केले आहे.

COMMENTS