पंढरपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज, सोमवारी पंढपूरात पालखी मार्गाचे उद्धाटन झ
पंढरपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज, सोमवारी पंढपूरात पालखी मार्गाचे उद्धाटन झाले. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग स्वरुपात उपस्थिती लावली. पंढरपूरला जोडणाऱ्या सुमारे 225 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह वारकऱ्यांच्या उपस्थितीत या पालखी मार्गाचं उद्धाटन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी कार्यक्रमाला संबोधित करताना मराठीमध्ये आपल्या भाषणाला सुरूवात केली. या पालखी मार्गामुळे भगवान विठ्ठलाच्या सेवेसोबतच, विकासाला देखील चालना देणारे ठरणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. पंढरपूरला जोडणाऱ्या या महामार्गासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचं अभिनंदन करतो असंही ते म्हणाले.”मी सर्व वारकऱ्यांना नमन करतो, कोटी कोटी अभिवादन करतो,” असे म्हणत त्यांनी उपस्थितांचे अभिनंदन केले.
COMMENTS