Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी ३० अर्ज वैध

पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जांच्या छाननीत ३८ पैकी आठ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले तर ३० अर्ज वैध ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

जागतिक विमा परिषदेसाठी धनश्री कडलग यांची निवड
सोशल मीडियाच्या गुरफटलेल्या युवकांना संताचे कार्य  कळणे गरजेचे ;- डॉ.बंडूशेठ भांडकर
वरखेड यात्रा नियोजनासाठी उद्या नगरला होणार बैठक

सोलापूर : पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जांच्या छाननीत ३८ पैकी आठ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले तर ३० अर्ज वैध ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ३ एप्रिलपर्यंत आहे. दरम्यान, बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांची पक्षाने हकालपट्टी केली आहे. या पोटनिवडणुकीसाठी एकूण ३८ जणांनी ४४ अर्ज दाखल केले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके, भाजपचे समाधान आवताडे यांच्या अर्जावर मोहन हळणवर यांनी हरकती घेतल्या होत्या. भालके हे विठ्ठल सहकारी तर आवताडे हे दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. शासकीय येणे बाकी थकीत असल्याने दोन्ही कारखान्यांवर राज्य सरकारने आरआरसी कारवाई केली आहे. अध्यक्ष या नात्याने त्याला दोघेही जबाबदार असल्याने त्यांचे अर्ज अवैध ठरवण्याची मागणी केली होती. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी गुरव यांनी हरकती फेटाळल्या. त्यांच्यासह शैला गोडसे (बहुजन विकास आघाडी), सचिन शिंदे (स्वाभिमानी शेतकरी संघटना), संजय माने (महाराष्ट्र विकास आघाडी), महेंद्र जाधव (पीपल्स रिपब्लिकन पार्टी), राजाराम भोसले (बळीराजा पार्टी), सिध्देश्वर आवारे (बहुजन महापार्टी) बिरप्पा मोटे (वंचित बहुजन आघाडी) आदींसह ३० जणांचे अर्ज वैध ठरले आहेत. दरम्यान, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

COMMENTS