नेप्ती परिसरात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाचे कामे होणार -गाडे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नेप्ती परिसरात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाचे कामे होणार -गाडे

अहमदनगर (प्रतिनिधी)-  नगर तालुक्यावर महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख यांचे विशेष लक्ष आहे. त्यामुळे नेप्ती परिसरातील निमगाव व

अ‍ॅड. आंबेडकरांचा वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा
गर्भपाताच्या गोळ्यांमुळे युवतीचा झाला मृत्यू. गुन्हा दाखल
*LokNews24 ; अ. नगर जिल्ह्यात आणखी कडक निर्बंध , जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश l पहा LokNews24*

अहमदनगर (प्रतिनिधी)- 

नगर तालुक्यावर महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख यांचे विशेष लक्ष आहे. त्यामुळे नेप्ती परिसरातील निमगाव वाघा, हिंगणगाव, हमीदपूर, जखणगाव, टाकळी खातगाव आदी गावात जास्तीत जास्त जलसंधारणाचे कामे मार्गी लावून संपुर्ण परिसर पाणीदार होणार आहे. या भागासह नगर तालुक्यातील सर्व गावांचा दुष्काळ हटविण्यात येणार आहे. नेप्ती परिसरातील जास्तीत जास्त तलावांची दुरुस्ती जलसंधारण मंत्री गडाख यांच्या माध्यमातून केली जाणार आहे. या तलावावर अवलंबून असणार्‍या गावांना त्याचा मोठा फायदा होणार असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रा. शशीकांत गाडे यांनी केले.

गाव तेथे शिवसेना शाखा या अभियानातंर्गत नगर तालुक्यातील नेप्ती शिवसेना शाखेच्या नुतनीकरण कार्यक्रमाप्रसंगी गाडे बोलत होते. प्रारंभी नेप्ती फाटा येथे शिवसेना शाखेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, माजी जि.प. सदस्य अरुण होळकर, माजी सभापती रामदास भोर, उपसभापती डॉ. दिलीप पवार, शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते, तालुका प्रमुख राजेंद्र भगत, तालुका उपप्रमुख जालिंदर शिंदे, प्रकाश कुलट, शाखा प्रमुख बबनराव फुले, रामदास फुले, सरपंच सुधाकर कदम, माजी सरपंच संजय जपकर, विठ्ठल जपकर, दिलीप होळकर, शिवाजी होळकर, उपसरपंच संभाजी गडाख, राजेंद्र होळकर, राहुल गवारे, बाळासाहेब बेल्हेकर, गोरख फुले, बाळासाहेब होळकर, अरुण होले, सुरेश कदम, गोटीराम पवार, सतीश होळकर, सत्तार सय्यद, जमीर सय्यद, राजेंद्र फुले आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.  

पुढे बोलताना गाडे म्हणाले की, शाखेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रश्‍न सोडविण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना जनते पर्यंत शिवसैनिकांनी घेऊन जावून जनसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी कटिबध्द रहावे. शिवसेना बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरु असून, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची तयारी सुरु करण्यात आली आहे. शिवसैनिकांनी गाफिल न राहता कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भगवा फडकविण्याचे आवाहन केले. नगर तालुक्यातील उपतालुका प्रमुख जालिंदर शिंदे व बबन फुले यांच्या कामाचे त्यांनी कौतुक केले.

COMMENTS