निवडणूक निकालानंतर जल्लोषावर बंदी : निवडणूक आयोग

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निवडणूक निकालानंतर जल्लोषावर बंदी : निवडणूक आयोग

देशातील 4 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांचे निकाल 2 मे रोजी जाहीर होणार आहेत. या दिवशी विजय साजरा करणाऱ्या रॅलीजवर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला असल्याचे आयोगाने स्पष्ट केले. 

अकोले शहरात डॉ. आंबेडकरांचे भव्य स्मारक उभारा
इस्त्रो चंद्रावर पाठवणार माणूस
माणिकपणे आणि माणुसकीने काम केल्याचे समाधान मोठे ः शंकरराव परदेशी

नवी दिल्ली : देशातील 4 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांचे निकाल 2 मे रोजी जाहीर होणार आहेत. या दिवशी विजय साजरा करणाऱ्या रॅलीजवर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला असल्याचे आयोगाने स्पष्ट केले.  

आगामी 2 मे रोजी आसाम, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ आणि पद्दुचेरीमध्ये विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. मद्रास उच्च न्यायालयाने सोमवारी निवडणूक आयोगावर ताशेरे ओढल्यानंतर आयोगाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. मद्रास उच्च न्यायालयाने मतमोजणीच्या दिवशी करोनाच्या नियमांचे पालन कशा पद्धतीने केले जाईल यासंबंधी ब्ल्यू प्रिंट सादर करण्यास निवडणूक आयोगाला सांगितले होते. पाचही राज्यांमध्ये प्रचारसभांदरम्यान करोनाच्या नियमांचे जाहीरपणे उल्लंघन होत असतानाही राजकीय पक्षांना न रोखल्याने मद्रास उच्च न्यायालयाने नाराजी जाहीर केली होती.

COMMENTS