निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक लोखंडे यास पाच दिवसाची पोलीस कोठडी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक लोखंडे यास पाच दिवसाची पोलीस कोठडी

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी  राहुरी तालुक्यातील डिग्रस येथिल आधारवेल फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा  वैशाली नान्नोर यांच्या दोन्ही मुलांना ओलिस

आयर्न मॅन स्पर्धेत डॉ. जय पोटे यांचा 22 वा क्रमांक
‘या’ उपजिल्हा रुग्णालयात 10 व्हेंटिलेटर 7 महिन्यांपासून धूळखात | ‘१२ च्या १२ बातम्या’ | Lok News24
अज्ञातांनी दवाखान्यात वापरलेले साहित्य टाकले वस्तीजवळ, कोरोना पसरतोय वेगाने | LokNews24

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

राहुरी तालुक्यातील डिग्रस येथिल आधारवेल फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा  वैशाली नान्नोर यांच्या दोन्ही मुलांना ओलिस ठेवून  त्यांचा घातपात करण्याच्या हेतुनेच निलंबित  साहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल लोखंडे याने प्रयत्न केला आहे.त्याने पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके यांच्यावर  चालवलेल्या दोन गोळ्यामुळे पोलीसांनी दोन स्वतंञ गुन्हे दाखल करुन आरोपी सुनिल लोखंडे यास राहुरी न्यायालयात न्या.सुजाता शिंदे यांच्या समोर हजर केले असता 13 आँक्टोबर पर्यंत पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

आधारवेल फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा वैशाली नान्नोर यांच्या बंगल्यात शिरुन दोन्ही मुलांच्या डोक्याला पिस्तुल लावून ओलीस ठेवले होते. या दोन्ही मुलांची सुटका करताना पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता.गुरवारी घटनास्थळावरुन लोखंडे यास ताब्यात घेण्यात आले. सायंकाळी उशिरा त्याच्या विरोधात पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके यांनी स्वतंञ फिर्याद दाखल करुन गुन्हा रंजि.नं.849/2021 भादवि कलम 307,353,332,506, सह कलम आर्म एक्ट 3/25,5/27 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तर आधारवेल फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा वैशाली नान्नोर यांची मुलगी साक्षी संजय नान्नोर वय 19 हिच्या फिर्यादी वरुन गुन्हा   रंजि. नं.  848/2021 भादवि कलम 307,450,364,342,506,195(a), 387, सह कलम आर्म ॲक्ट 3/25,5/27 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील लोखंडे (रा.501 शिवानंद गार्डन हाऊसिंग सोसायटी वानवडी पुणे) यास राञी उशिरा या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.त्यानंतर त्याची सुमारे तीन तास वैद्यकिय तपासणी करण्यात आली.

लोखंडे याच्याकडे पोलीसांनी अधिक चौकशी केली असता त्याने तोंड उघडले नाही.वैद्यकिय तपासणी नंतर त्यास कोठडीत ठेवण्यात आले होते.लोखंडे याने कोठडीत राञ जागुन काढली.शुक्रवारी दुपारी लोखंडे यास राहुरी न्यायालयातील न्या.सुजाता शिंदे यांच्या न्यायालयात हजर केले असता 13 आँक्टोबर पर्यंत 5 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके यांनी दिलेल्या फिर्यादीचा तपास संगमनेरचे पोलिस उपअधिक्षक राहुल मदने तर साक्षी नान्नोर हिने दिलेल्या फिर्यादीचा तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे हे करीत आहे.

COMMENTS