ना.भुजबळ साहेब! आश्रीत नाही तर बांडगुळांचे वेल उपटा!!

Homeताज्या बातम्यासंपादकीय

ना.भुजबळ साहेब! आश्रीत नाही तर बांडगुळांचे वेल उपटा!!

ना.भुजबळ साहेब!  या राज्यातील जनतेचे, विशेषतः ओबीसी मागास उपेक्षीत घटकांचे हितैषी म्हणून आपणाकडे पाहीले जाते. आणि म्हणूनच आपल्या प्रत्येक हालचालींना,

डॉ. शिवाजी काळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
सत्ताधारी जातवर्ग आरोपांच्य छायेत !
प्रादेशिक पक्ष काँगे्रसमध्ये विलीन होतील


ना.भुजबळ साहेब!  या राज्यातील जनतेचे, विशेषतः ओबीसी मागास उपेक्षीत घटकांचे हितैषी म्हणून आपणाकडे पाहीले जाते. आणि म्हणूनच आपल्या प्रत्येक हालचालींना,कृतीला,निर्णयाला धोरणात्मक अर्थ जोडला जात असल्याने आपला भवताल प्रदुषीत नव्हे तर शुध्द सात्विक विचारांचे अधिष्ठान असलेला असावा अशी अपेक्षा बाळगणे गैर नक्कीच नाही,आपण व्यक्तीगत चौकटीची मर्यादा केंव्हाच ओलांडली आहे. आपले जीवन सार्वजनिक आहे.म्हणूनच आपल्या आजुबाजूला वावरणारी मंडळी कोण आहेत? त्यांचे उद्योग काय आहेत? समाजासाठी त्या उद्योगांचा फायदा होतो की तोटा? आपल्या नावावर ही मंडळी समाजातील भोळ्या भाबड्या आशावादींचे आर्थिक मानसिक शोषण तर करीत नाहीत ना? यावर आपले लक्ष असलेच पाहीजे..


ना.भुजबळ साहेब! गाव तसे चांगले पण वेशीवर टांगले,या ग्राम्य म्हणीविषयी आम्ही आपणास अधिक काही सांगावे एव्हढी आमची पात्रता नाही,आपण जात्याच कलाकार,अभ्यासू समाजकारणी,राजकारणी आहात.माणसाची देहबोली जाणण्याचा आपला वकूब सर्वज्ञात आहे. पण कधी कधी कितीही चतूर,प्रसंगावधानी असलात तरी मोहीनी माणसाला आभासी वातावरणात गुंगवून ठेवते. आणि मग गावाचे चांगूलपण आपल्याच हाताने आपण वेशीवर केंव्हा टांगून ठेवतो हे गावकारभाऱ्याला उमजत नाही. जी गोष्ट गावासाठी तीच गोष्ट आपल्या प्रत्येकाच्या घरासाठी आणि सार्वजनिक तसेच  व्यक्तीगत जीवनासाठीही लागू असते,  म्हणूनच आपला गोतावळा कितीही विश्वासार्ह असला तरी त्याचे उद्योग आपले चांगूलपण वेशीवर टांगणार नाही यासाठी स्वतःलाच खबरदारी घ्यायची असते,माणसाचे जीवन जेंव्हा व्यक्ती आणि कुटूंबापुरते मर्यादीत असते तेंव्हा या गोतावळ्याच्या उद्योगांचा परिणाम चौकटीपुरताच उरतो,मात्र सार्वजनिक क्षेत्रात सक्रीय व्यक्तींच्या बाबतीत हाच परिणाम सर्वव्यापी म्हणून समाजालाही वेठीस धरतो,आपण तर या राज्यातील जनतेचे विशेषतः ओबीसी मागास उपेक्षीत घटकांचे हितैषी म्हणून आपणाकडे पाहीले जाते.आणि म्हणूनच आपल्या प्रत्येक हालचालींना,कृतीला,निर्णयाला धोरणात्मक अर्थ जोडला जात असल्याने आपला भवताल प्रदुषीत नव्हे तर शुध्द सात्विक विचारांचे अधिष्ठान असलेला असावा अशी अपेक्षा बाळगणे गैर नक्कीच नाही,आपण व्यक्तीगत चौकटीची मर्यादा केंव्हाच ओलांडली आहे.आपले जीवन सार्वजनिक आहे. म्हणूनच आपल्या आजुबाजूला वावरणारी मंडळी कोण आहेत? त्यांचे उद्योग काय आहेत? समाजासाठी त्या उद्योगांचा फायदा होतो की तोटा? आपल्या नावावर ही मंडळी समाजातील भोळ्या भाबड्या आशावादींचे आर्थिक मानसिक शोषण तर करीत नाहीत ना? यावर आपले लक्ष असलेच पाहीजे.
झोंबीकार आनंद यादव यांच्या एका कांदबरीत एक कथा आहे. गोतावळा.यात निसर्गाचा समतोल साधतांना गोतावळ्याचे महत्व विषद केले आहे. गावातील बदलत जाणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अनेक बदल होताना, माणसांची विचारसरणी बदलत असताना त्याचा मुक्या जनावरांवर होणारा परिणाम, त्यामुळे बदलत जाणारं समीकरण आणि त्यातून हळू हळू बदलत चाललेली आपली संस्कृती याची एक छान उजळणी होते. मुक्या जनावरांनाही गोतावळ्याने निर्माण केलेले वातावरण प्रभावित करू शकते तर आपल्या भवताली हाडामासांची जीवंत माणसांची मांदीयाळी आहे,छोट्याशा गोष्टीतूनही मोठा अर्थ आणि अनर्थही काढण्याची उपजत बुध्दी माणसाने विकसीत केली आहे. आपल्या गोतावळ्यातील काही मंडळींचे काही उद्योग आपली प्रतिमा कलंकीत करण्यास कारणीभूत ठरले,आजही हीच मंडळी आपल्या नावावर असे नाना उद्योग करीत असल्याची खात्रीशीर माहीती आहे.
नामदार साहेब! या गोष्टींची आपणास अलिकडच्या काळात जाणीव होऊ लागल्याचेही संकेत आहेत.त्यांचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने आपली पाऊलेही पडतांना दिसत आहेत. काही अपप्रवृत्तींना कायदेशीर धडा शिकवण्यासाठीही आपण सक्रीय झाल्याची माहिती आहे,चांगला निर्णय घेतलात आपण! पण रोगाचे मुळ शोधण्याचीही आपणास तसदी घ्यावी लागेल. कर्करोगावर कितीही उपचार केले,शस्रक्रीया केली तरी मुळ रोगट पेशी शरीरातून हद्दपार होत नाहीत तोपर्यंत कर्करोग पसरतच रहातो. आपण ज्यांच्यावर कारवाई करीत आहात ते मुळातच परजीवी..म्हणजे आपल्या वटवृक्षावर पोसणाऱ्या बांडगुळांचे आश्रीत. त्या आश्रीतांवर कारवाई करून आपण त्यांचा बंदोबस्त कराल..पण बांडगुळांचे काय? ते पुन्हा नवीन आश्रीत शोधून आपल्या लोकप्रियतेचे,दबदब्याचे शोषण करून पोट भरणारच. किती शस्रक्रीया करणार आपण. तोपर्यंत आपल्या प्रतिमेचे पुर्ण हनन करणार ही मंडळी.
मंत्रीमंडळ आणि प्रशासनावरही आपली चांगली पकड आहे,ही पकड सार्वजनिक कारणास्तव वापरता यावी म्हणून आपले अधिकृत सचिव मंडळ सतत धडपड करते,मात्र पडद्याआडही एक व्यवस्था काम करीत असल्याने आपल्याविषयी जनमानसात आणि प्रशासनातही संभ्रम निर्माण झाला आहे. आदेश कुणाचा मानावा? असा प्रश्न प्रशासनासमोर उभा आहे,नुकत्याच झालेल्या बदली प्रक्रीयेतही असा गोंधळ झाल्याची चर्चा आहे.बदली प्रक्रीया सुरू असतांना अनेक अधिकारी आपल्या व्यवस्थेच्या संपर्कात होती,त्यातील अनेकांची निराशा झाली.कालापव्ययाचा पश्चाताप आजही त्या चेहऱ्यांवर स्पष्ट दिसतो आहे.अधिकृत यंत्रणेपेक्षा अनाधिकृत बांडगूळ यंत्रणेचा धाक प्रशासनाला वाटत आहे.भिक नका पण कुत्रे आवरा असा निरोप धाडण्याचे मनात असले तरी प्रशासनाला ते धाडस होत नाही.
आता हे आणखी एक उदाहरण पहा,आपण सर्व बालंट दुर करून पुन्हा मंत्री झालात. राजकारणात आपला पुर्वीसारखाच दबदबा निर्माण केलात, म्हणून आपला भवताल पुन्हा संधीसाधूंनी खचाखच भरला . यातच पुर्वीपासून बांडगूळ म्हणून जगणाऱ्या संधीसाधूनी नवे आश्रीत शोधून कमाईचा गोरखधंदा सुरू केला. आपला ओएसडी किंवा स्वीय सहाय्यक म्हणून नियुक्ती देण्यासाठी अनेक भोळ्या भाबड्यांना फसविण्याचा गोरखधंदा…एका भोळ्या भाबड्याला असाच सव्वा आठ लाखाला गंडा घालून आपल्या गोतावळ्यातील काही मंडळींनी आपले उखळ पांढरे करून घेतल्याची चर्चा आहे. या संदर्भाविषयी आपण अनभिज्ञ आहात याविषयी आम्हाला खात्री आहे,बांडगूळांनी परस्पर ही फसवणूक करून आपला विश्वासघात केला. चर्चा मात्र आपल्या नावाची होते आहे. भुजबळ फार्म वर गोळा झालेल्या  गोतावळ्यातील या बांडगुळांमुळे या राज्याचे दमदार नेतृत्व खच्ची होऊ नये एव्हढाच हेतू आहे. किरीट सोमय्यांसारख्या बोलघेवड्यांचा जेव्हढा धोका नाही त्याहूनही अधिक धोका या बांडगुळांचा आपल्याला आहे.म्हणूनच आश्रीत नाही तर या बांडगुळांचे वेल उपटून टाका. सुज्ञास अधिक सांगणे न लगे!

COMMENTS