नागरिकांनी नियम पाळले नाही तर लोकडाऊन अटळ – जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले

Homeताज्या बातम्याशहरं

नागरिकांनी नियम पाळले नाही तर लोकडाऊन अटळ – जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले

।संगमनेर/प्रतिनिधी। नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन केले नाही आणि रुग्ण संख्या अशीच वाढत राहिली तर संपूर्ण लोकडाऊन हा एकमेव पर्याय असल्याचे जि

राष्ट्रवादी पक्षात युवकांना सन्मानासह काम करण्याची संधी -आ. संग्राम जगताप
12 वर्षाखालील मुला-मुलींसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा
माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या शाखांना संचालक बाबासाहेब बोडखे यांची भेट

।संगमनेर/प्रतिनिधी।

नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन केले नाही आणि रुग्ण संख्या अशीच वाढत राहिली तर संपूर्ण लोकडाऊन हा एकमेव पर्याय असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले. संगमनेर तालुक्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज शुक्रवार दि.१ रोजी जिल्हाधिकारी याठिकाणी आले होते. पंचायत समिती सभागृहात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हि माहिती दिली. संगमनेर, पारनेर, राहता याठिकाणी रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरुवात इथून होऊ नये यासाठी प्रतिबंद्धीत क्षेत्र तयार करण्यात येणार आहे. जवळपास ११७ गाव अशी आहेत ज्याठिकाणी रुग्णसंख्या हि जास्त आहे. अशा गावांत आरोग्य पथक तयार करून नागरिकांची कोरोना चाचणी आणि लसीकरणाचे काम पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी घरातच विलगीकरणात न राहता प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या शाळेत किंवा मंगल कार्यालयात रहावे. तसेच अशा परिस्थिती लोकप्रतिनिधींचा सहभाग अतिशय महत्वाचा असल्याचे यावेळी बोलताना ते म्हणाले. यावेळी प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, पोनी. मुकुंद देशमुख, ग्रामीण रुग्णालय वैदकीय अधिकारी, तालूका वैद्यकीय सुरेश घोलप, पंच्यात समिती सभापती सुनंदा जोर्वेकर, उपसभापती नवनाथ अरगडे यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. 

COMMENTS