नसरीन इनामदार यांना नेशन्स बिल्डर अवार्ड’ प्रदान

Homeताज्या बातम्याअहमदनगर

नसरीन इनामदार यांना नेशन्स बिल्डर अवार्ड’ प्रदान

कोपरगाव / ता.प्रतिनिधी  कोपरगाव नगरपालिका शाळा क्र.५ च्या सहशिक्षीका  श्रीमती.नसरीन इनामदार यांना  शैक्षणिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय का

कोपरगावमध्ये तब्बल 16 लाखांचा गुटखा जप्त
Sangamner : मराठा आणि ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना फी माफ करून दिलासा द्या (Video)
पडक्या वाड्याच्या आडोशाला सुरू होता जुगाराचा अड्डा…

कोपरगाव / ता.प्रतिनिधी 

कोपरगाव नगरपालिका शाळा क्र.५ च्या सहशिक्षीका  श्रीमती.नसरीन इनामदार यांना  शैक्षणिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल  ‘शिर्डी रोटरी क्लब साईबाबा’ यांनी’नेशन्स बिल्डर अवार्ड’ देऊन सन्मानीत केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजीराव गोंदकर होते  कैलासबापू कोते ,सचिन कोते, शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी डोईफोडे ,रोटरी क्लब ऑफ शिर्डी साईबाबा चे अध्यक्ष रविकिरण डाके, डॉ.पांडुरंग गुंजाळ यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.

श्रीमती.नसरीन इनामदार या नगरपालिका शाळा क्रं.५कोपरगाव येथे सहशिक्षिका म्हणून कार्यरत असून त्यांनी विद्यार्थ्यांकरीता विविध उपक्रम राबविले आहेत.विविध तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाइन शिक्षण देऊन तसेच घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना ऑफलाइन शिक्षण देऊन शैक्षणिक प्रवाहात टिकवून ठेवले.कोरोना काळात त्यांनी केलेल्या विशेष शैक्षणिक कार्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू राहिले.   

COMMENTS