नवीन खेळाडूंना चालना देण्याकरिता चेस इन स्कूल हा उपक्रम शहरात राबविणार -नरेंद्र फिरोदिया

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवीन खेळाडूंना चालना देण्याकरिता चेस इन स्कूल हा उपक्रम शहरात राबविणार -नरेंद्र फिरोदिया

अहमदनगर (प्रतिनिधी)-  कोरोनाचा प्रादुर्भाव नाहिसा झाल्यानंतर दिवाळी नंतर अथवा नवीन वर्षात निश्‍चित प्रत्यक्ष ऑफलाईन बुध्दीबळ स्पर्धा घेतल्या जाणार

‘काढा तण – वाचवा वन’ या ऐतिहासिक अभियानास” अहमदनगर जिल्ह्यात सुरूवात
विश्वस्त पदाच्या माध्यमातून भाविकांची सेवा करण्याची संधी – सौरभ बोरा
अहमदनगर : शहरातील रस्त्यांचे खड्डे प्रकरण थेट कोर्टात

अहमदनगर (प्रतिनिधी)- 

कोरोनाचा प्रादुर्भाव नाहिसा झाल्यानंतर दिवाळी नंतर अथवा नवीन वर्षात निश्‍चित प्रत्यक्ष ऑफलाईन बुध्दीबळ स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. बुध्दीबळ खेळाच्या प्रचार-प्रसारासाठी व नवीन खेळाडूंना चालना देण्याकरिता चेस इन स्कूल हा उपक्रम शहरात राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातून जास्तीत-जास्त ग्रॅण्डमास्टर तयार करणे या संघटनेचे उद्दीष्ट असून, त्या दृष्टीने वाटचाल सुरु असल्याची भावना उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी व्यक्त केली. तसेच राज्यपालांच्या हस्ते झालेला सन्मान हा प्रत्येक नगरकरांचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अहमदनगर जिल्हा बुध्दीबळ संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष असलेले उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते चॅम्पियन्स ऑफ चेंज महाराष्ट्र हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी, सचिव यशवंत बापट, सुबोध ठोंबरे, विश्‍वस्त पारुनाथ ढोकळे, प्रकाश गुजराथी, सीए प्रविण दोरगे, बी.जी. गायकवाड, मोहन साकतकर, राहुल जरे, सत्यम वरुडे, नवनित कोठारी, बलभिम कांबळे, देवेंद्र ढोकळे, शाम कांबळे, प्रणित कोठारी, डॉ. स्मिता वाघ, अनुराधा बापट, अनुपमा वाखारे आदिंसह संघटनेचे पदाधिकारी, खेळाडू व पालक उपस्थित होते.

पुढे बोलताना फिरोदिया म्हणाले की, बुध्दीबळ खेळाला चालना देण्यासाठी व खेळाडूंच्या उज्वल भवितव्यासाठी संघटना राजकारण बाजूला करुन योगदान देत आहे. 2022 चा आरखडा तयार करुन जास्तीत-जास्त बुध्दीबळाच्या स्पर्धा घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. तर गुणवंत खेळाडूंच्या मागे संघटनेच्या माध्यमातून नेहमीच पाठबळ राहणार असल्याचे आश्‍वासित केले.

प्रारंभी कोरोना काळात निधन झालेले खेळाडू, प्रशिक्षक यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक यशवंत बापट यांनी कोरोना काळात बुध्दीबळ स्पर्धा प्रत्यक्ष न घेता आल्या असल्या तरी, संघटनेच्या वतीने ऑनलाईन स्पर्धा यशस्वी करण्यात आली. यामध्ये राज्यातील अनेक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. लवकरच कोरोनाचे संक्रमण कमी झाल्यावर स्पर्धा घेणार असल्याचे सुचित केले. उपस्थित खेळाडू पालकांच्या वतीने संजय पांढरकर यांनी कोरोनाच्या दोन वर्षात खेळाडूंच्या प्रत्यक्षपणे कोणत्याही स्पर्धा झाल्या नसून, लवकरात-लवकर ऑफलाईन बुध्दीबळाच्या स्पर्धा घेण्याबाबत सुचना केल्या. 

नरेंद्र कुलकर्णी म्हणाले की, संघटनेच्या वतीने जिल्ह्यात बुध्दीबळ खेळाची मुहुर्तमेढ रोवण्यात आली. या खेळाला उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी पाठबळ देऊन चालना देण्याचे कार्य केले. यामुळे अनेक गुणवंत खेळाडू पुढे आले. त्यांना मिळालेला पुरस्कार हा नगरकरांच्या दृष्टीने अभिमानास्पद गोष्ट आहे. व्हिजन असलेले व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. शहराच्या विकासासाठी त्यांनी राजकारणात येण्याची गरज असल्याची आशा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पारुनाथ ढोकळे यांनी केले. आभार सुबोध ठोंबरे यांनी मानले.

COMMENTS