नवाब मलिकांचा बार फुसका, भाजपावर आरोप करणारे तोंडघशी (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवाब मलिकांचा बार फुसका, भाजपावर आरोप करणारे तोंडघशी (Video)

 राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी किरण गोसावी हा भाजपा आमदाराच्या पत्नीच्या कंपनीत संचालक असल्याबद्दल केलेला आरोपाचा बार फुसका ठरला आहे. भाजपाचे

Nawab Malik : शेवटी मोदी सरकारला झुकवण्याचे काम देशातील शेतकऱ्यांनी केले | LOKNews24
समीर वानखेडेला वर्षभरात तुरूंगात टाकणार – मलिक यांचा इशारा
नवाब मलिक राहणार शरद पवारांसोबत

 राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी किरण गोसावी हा भाजपा आमदाराच्या पत्नीच्या कंपनीत संचालक असल्याबद्दल केलेला आरोपाचा बार फुसका ठरला आहे. भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी आज `मायक्रोबायॉलॉजिस्ट’ असलेल्या किरण गोसावींना पत्रकार परिषदेत समोर आणले. आणि  नवाब मलिकांसह सोशल मिडियावर भाजपाला आरोपींच्या पिंजऱ्यात बसविणारे तथाकथित समाजमाध्यमी तोंडघशी पडले.
भाजपा आमदार निरंजन डावखरे यांच्या पत्नी निलिमा डावखरे आणि किरण गोसावी एका कंपनीत संचालक असल्याचे स्नॅप शॉट्स काल समाजमाध्यमांवर प्रसारीत झाले होते. मंत्री नवाब मलिकांच्या पत्रकार परिषदेनंतर दहा-पंधरा मिनिटांनंतर स्नॅप शॉट्स व्हायरल झाले. त्यामुळे भाजपाविरोधात ब्रह्रास्त्र सापडल्याच्या आनंदात व आर्यन खानच्या माध्यमातून स्वत:चा पर्सनल अजेंडा राबविण्याचा प्रयत्न करणारे तोंडघशी पडले आहेत, अशी टीका आमदार निरंजन डावखरे यांनी केली.

COMMENTS