Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नर्स चा ड्रेस घातला आणि 3 महिन्याच्या मुलीला घेऊन पळून गेली.

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध ससून हॉस्पिटलमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 3 महिन्याच्या मुलीला नर्सच्या वेशभूषेत आलेल्या महिलेने वॉर्डातून पळवल्याच

नाशिक विभाग शिक्षक विधानपरिषद निवडणूक ताकतीने लढवणार : दत्तात्रय पानसरे
मुंबईतील दहशतवादाचा कट उधळला
मंत्री अशोक चव्हाण यांच्या अधिपत्याखाली सार्वजनिक बांधकाम खात्यात संगनमताने भ्र्रष्टाचार सुरु l LokNews24

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध ससून हॉस्पिटलमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 3 महिन्याच्या मुलीला नर्सच्या वेशभूषेत आलेल्या महिलेने वॉर्डातून पळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 22 वर्षीय महिला आणि तिची तीन महिन्याची मुलगी अनेक दिवसापासून ससून रुग्णालयात उपचार होते घेत होते.

नर्सच्या वेषात येऊन बाळाळा पळवलं
सव्वीस वर्षीय महिला आणि तिच्या पतीने तीन महिन्याच्या मुलीला पळविल्याने रुग्णालयात एखच खळबळ निर्माण झाली आहे. सविस्तर माहिती अशी की, नर्सचा ड्रेस घालून 26 वर्षीय महिला ससून रुग्णालयात शिरली. संधी साधत तिने वॉर्डात प्रवेश मिळवला. अन् बाळाच्या आईचं दुर्लक्ष होताच तिने डाव साधला. काही मिनिटांत तिने बाळाला घेऊन तिथून पोबारा केला.

आपलं बाळ आपल्या शेजारी होतं आणि आता नाहीय या कल्पनेने बाळाच्या आईने हंबरडा फोडला. आईच्या हंबरड्याने वॉर्डात उपचार घेत असलेल्या रुग्णांना देखील गलबलून आलं. यावेळी रुग्णालयात अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला.

आरोपी पती पत्नीला अपत्य होत नसल्यामुळे ससूनमधील तीन महिन्याचं बाळ पळविल्याची प्राथमिक माहिती आहे. परंतु रुग्णालयात चक्क नर्सच्या वेशभूषेत येऊन बाळ पळविल्याने ससूनची सुरक्षा यंत्रणा एवढी गहाळ कशी असू शकते, असा संतप्त सवाल पुणेकर विचारत आहेत.

ससून रुग्णालय प्रशासनाला घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने पोलिसांना संपर्क साधला. पोलिसांनीही वेगाने सूत्रे फिरवित अगदी काही तासांतच आरोपी महिला आणि पुरुषाला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी आरोपींच्या तावडीतून बाळाची सुखरुप सुटका केली असून पोलिसा पुढील चौकशी करत आहेत.

आरोपी पती पत्नीला अपत्य होत नसल्यामुळे बाळ पळवलं
आरोपी पती पत्नीला अपत्य होत नसल्यामुळे त्यांनी ससूनमध्ये येऊन बाळ पळविण्याचं धाडस केलं. एरव्ही ससूनमधील सुरक्षा यंत्रणा अतिशय सतर्क असते. मग या प्रसंगात सुरक्षा यंत्रणा कशामुळे गहाळ राहिली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिस विविध अंगांनी तपास करत आहेत.

COMMENTS