नरेंद्र पाटील यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नरेंद्र पाटील यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊन दीड वर्ष लोटले तरी मुख्यमंत्र्यांनी माथाडी कामगारांचे प्रश्‍न सोडवलेले नाहीत.

पुणे भाजपमधील गटबाजी चव्हाटयावर
जागतिक विमा परिषदेसाठी सुनील कडलग यांची निवड
औरंगाबाद व उस्मानाबादचे नामांतर केवळ शहरापुरतेच

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊन दीड वर्ष लोटले तरी मुख्यमंत्र्यांनी माथाडी कामगारांचे प्रश्‍न सोडवलेले नाहीत. माथाडींच्या प्रश्‍नांबाबत चर्चा करण्यासाठी वेळ मागूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झालेली नाही, असा थेट आरोप करत माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. मात्र यानंतर पाटील कोणत्या पक्षात प्रवेश करणार, हे अद्यापही अस्पष्ट आहे.  

माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमिती आयोजित कार्यक्रमामध्ये नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेपासून फारकत घेण्याची घोषणा केली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात चांगले संबंध आहेत ते शिवसेनेच्या नेत्यांना खूपत होते. तसेच मी शिवसेनेत राहू नये असे पक्षातील नेत्यांना वाटत असल्याने मी शिवसेना सोडण्याता निर्णय घेत आहे, असे नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा करताना सांगितले. नरेंद्र पाटील हे सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादी कांग्रेसमध्ये होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस सोडून ते भाजपामध्ये आले होते. मात्र 2019 मध्ये सातार्‍यातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र त्या निवडणुकीत उदयनराजे भोसलेंकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

COMMENTS