अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील अनेक परीसरात अवैध धंदे दारू, जुगार, मटका या अवैध धंद्याचा सुळसुळाट जोमाने चालु आहे. हे अवैध धंदे खुलेआम सुरू
अहमदनगर (प्रतिनिधी)-
शहरातील अनेक परीसरात अवैध धंदे दारू, जुगार, मटका या अवैध धंद्याचा सुळसुळाट जोमाने चालु आहे.
हे अवैध धंदे खुलेआम सुरू असूनही पोलीस प्रशासनाचे हाताची घडी अन् तोंडावर बोट आहे. अवैध धंदे स्थानिक ठाणेदारांच्या आशिर्वादाने मोठ्या प्रमाणात सुरु असुन पोलीस कर्मचारी हप्ते घेत असल्याचीही खमंग चर्चा शहरात आहे. एवढे असतांनाही शहरात अवैध धंद्यांवर पोलीस अधीक्षक यांचे दुर्लक्ष पडला असल्याचे दिसत आहे.
शहरात काही महिन्यांपासून अवैध धंद्यांचा मोठा सुळसुळाट सुरु आहे. शहरातील ठेल्यांवर, हॉटेलमध्ये बेकायदा अवैध दारू राजरोसपणे सुरु आहेत. दारुबंदीच्या निर्णयानंतरही शहरात काही ठिकाणी राजरोसपणे दारु विक्री तसेच खुलेआम मटका आणि जुगार स्थानिक ठाणेदारांच्या आशिर्वादाने सुरुच असल्याचे चित्र आहे. पोलिस ठाण्यातीलच काही कर्मचाऱ्यांचे या अवैध धंदेवाल्यांशी आर्थिक हितसंबंध असल्याची धडक चर्चा आहे.
अवैध धंदे रोखण्याची स्थानिक पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही मानसिकता दिसून येत नाही. ते कानाडोळा करीत असल्याने येथील मटका, जुगार, दारू खुलेआम विक्री सुरु झाल्याने येथे गुन्हेगारांची संख्या देखील वाढली आहे. हे अवैद्य धंदे शहरातील रस्त्यालगत खुलेआम दुकाने थाटून सुरु आहेत. ही दुकाने स्थानिक व वरिष्ठ पोलीस अधिकारी ये-जा करतांना पाहत असतात. मात्र कारवाई का करत नाही? हा प्रश्न कायमच सतावत आहे.
या रस्त्यालगत अनेक दारुडे पडलेले आढळतात. मात्र काहीच कारवाई होत नाही. त्यामुळे स्थानिक शहरवासीयांकडुन पोलीस प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे सुरूवातीला अवैध धंदेवाल्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु सध्या अवैध धंदे जोरात चालू असून लवकरात लवकर या अवैध धंद्यावर कार्यवाही करण्यात यावी व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैद्य धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी समाजवादी पार्टी चे दक्षिण जिल्हाध्यक्ष अजीम राजे यांनी पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना अवैध धंदे बंद होण्यासाठी निवेदनाद्वारे मागणी केली आहेत.
COMMENTS