अहमदनगर प्रतिनिधी : कोरोना हा गेल्या शंभर वर्षातील सर्वात मोठा आर्थिक आणि आरोग्य संकट आहे. यामुळे रोजगार आणि लोकांच्या आरोग्यावर अभूतपूर्व नकारात
अहमदनगर प्रतिनिधी :
कोरोना हा गेल्या शंभर वर्षातील सर्वात मोठा आर्थिक आणि आरोग्य संकट आहे. यामुळे रोजगार आणि लोकांच्या आरोग्यावर अभूतपूर्व नकारात्मक परिणाम झालेला आहे.
त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडला आहे त्या अनुषंगाने अहमदनगर महानगरपालिका हद्दीत अनेक नागरिक मला प्रत्यक्ष भेटून माझ्याकडे मागणी केली आहे.
की अहमदनगर महानगरपालिका दंडा सह कर आकारणी करत आहे. कर भरण्यास नागरिक तयार आहेत पण काही आर्थिक अडचणी मुळे अनेक लोक महापालिकेने दिलेल्या मुदतीत कर भरू शकले नाही.
यामुळे नागरिकांच्या मालमत्ता कर मध्ये अतिरिक्त दंड (शास्ती कर) लागलेला आहे. शास्ती आपल्या अधिकारात 75 टक्के सूट दिल्याने अनेक करदाते उस्फूर्त पणे थकबाकी भरण्यास तयार होतील.
यामुळे थोडेफार प्रमाण महापालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल यातून विकास कामासाठी ही निधी उपलब्ध करता येईल.
COMMENTS