अहमदनगर/प्रतिनिधी- कपडे विश्वात अग्रगण्य नाव असलेल्या रेमंड कंपनीच्या नावाने निकृष्ट दर्जाचे कापड विकण्याचा प्रकार नगरमध्ये उघड झाला. रेमंड कंपनीच्य
अहमदनगर/प्रतिनिधी- कपडे विश्वात अग्रगण्य नाव असलेल्या रेमंड कंपनीच्या नावाने निकृष्ट दर्जाचे कापड विकण्याचा प्रकार नगरमध्ये उघड झाला. रेमंड कंपनीच्या अधिकार्याने कोतवाली पोलिसांच्या मदतीने खिस्तगल्लीतील शिंगी कापड दुकानावर छापा टाकून तेथे विकले जात असलेले नकली रेमंड कापड जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहेे.
याबाबतची माहिती अशी की, नगरमध्ये रेमंड नाव असलेले नकली कापड विक्री होत असल्याबाबत रेमंड कंपनीस माहीती मिळाल्याने कंपनीने दि. 16 पासून नगर शहरात तपासणीसाठी मनोज पै (रा. मुंबई) यांची नेमणूक केली. रविवारी (दि.17) नगर शहरातील खिस्त गल्ली भागात जाऊन तेथील दुकानांतील कापडांची पाहणी करीत असताना शिंगी एन्टरप्राईजेस या दुकानामध्ये रेमन्ड नावाचे नकली कापड दिसून आल्याने पै यांनी 1.20 मीटर कापड विकत घेतले. हे कापड़ घेऊन जाऊन ते नकली असल्याची पूर्ण खात्री केल्यानंतर सोमवारी (दि.18) रोजी त्यांनी कोतवाली पोलिसांची मदत मागितली. त्यानंतर त्यांनी पोलिसांच्या मदतीने शिंगी एन्टरप्राईजेस येथे छापा टाकला. यावेळी काउंन्टरवर असलेल्या व्यक्तीस पोलिसांनी त्याचे नाव-पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव अमोल धोंडीराम शिंगी (वय 46, वर्ष रा. खिस्त गल्ली, अहमदनगर) असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी दुकानाची तपासणी केली. त्यावेळी रेमन्ड उत्पादन कंपनीचा काहीएक संबंध नसलेले, पण हुबेहूब रेमन्ड नाव असलेले नकली कापड़ मिळून आले. 40 हजार 400 रुपये किमतीच्या रेमंड साफिरे कंपनीचे काळे रंगाचे कापडाचे एकूण 7 बंडलासह विविध कंपन्यांचे मिळून 1 लाख 1 हजाराचे नकली कापड जप्त केले व दुकान मालक अमोल धोंडीराम शिंगी याला ताब्यात घेतले. शिंगी याने रेमन्ड नाव असलेले सुटींगचे कापड खरे असल्याचे भासवून विक्री करण्यासाठी स्वत:च्या कब्जात साठवणूक करताना मिळून आला आहे. त्याच्याविरुध्द कोतवाली पोलिसांनी मनोज पै यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास सहाय्यक फौजदार शिंदे करीत आहे.
COMMENTS