नगरपालिकेने केली थकबाकीदाराची दुकाने सील

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरपालिकेने केली थकबाकीदाराची दुकाने सील

कोपरगांव नगरपरिषदेच्या विविध व्यापारी संकुलातील गाळे धारकांकडे थकीत असलेल्या गाळा भाडे व इतर कर वसुलीसाठी कोपरगांव नगरपरिषदेने दिनांक २३ मार्च २०२१ रोजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री.

बेरोजगारांना रोजगाराची सुवर्णसंधी… नावनोंदणी करण्याची गरज
आत्महत्या करण्याची पोस्ट करून तो झाला बेपत्ता…
विद्यार्थ्यांचे यश हेच गावाचे यश – शिवाजी कराड

कोपरगाव शहर प्रतिनिधी : कोपरगांव नगरपरिषदेच्या विविध व्यापारी संकुलातील गाळे धारकांकडे थकीत असलेल्या गाळा भाडे व इतर कर  वसुलीसाठी कोपरगांव नगरपरिषदेने दिनांक २३ मार्च २०२१ रोजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री.प्रशांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली  उपमुख्याधिकारी  सुनील गोर्डे यांच्यासह मार्केट विभागाच्या पथकाने धडक कारवाई करत थकबाकी दाराची दुकाने सील केली असून या कारवाई मुळे व्यापारी वर्गाचे धाबे दणाणले आहे.
सविस्तर वृत्त असे की मार्च एन्ड मुळे सगळीकडे शासकीय कराची वसुली मोहीम जोरात सुरू असून  यात आज कोपरगाव नगरपालिकेने देखील उडी घेत  जुनी मराठी शाळा शॉपिंग कॉम्प्लेक्स व बी.ओ. टी.शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील सहा गाळेधारकाकडे एकूण सरासरी ३७५००० रुपये भाडे व कर थकबाकी आसल्याने  हे  सहा गाळे नगरपालिकेच्या पथकाने  सील  केली आहे.तसेच नगरपालिकेचे वसुली मोहीम पथक आपल्या दारात वसुली साठी आल्याने थकबाकी दार पैकी काही गाळे धारकांनी भाडे व करापोटी ची बाकी रक्कम  जागेवर    चे

क स्वरूपात तर काहींनी  रोख रक्कम भरत आपल्यावर होणारी कारवाई टाळली आहे.
या वेळी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी सांगितले की गाळे भाडे व शासकीय  कर थकीत असलेले गाळे ताब्यात घेऊन त्याचा फेर लिलाव करण्यात येणार आहे.  अशाप्रकारची कारवाई येथून पुढे कायम राबविण्यात येणार असून थकबाकीदार व्यक्तींनी अपल्याकडे असलेले थकीत कर त्वरित भरून आपणावर होऊ घातलेली कटू कारवाई टाळावी असे  आवाहन मुख्याधिकारी शहर वासीयांना केले आहे.

COMMENTS