Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरचा पाणीपुरवठा दोन दिवस विस्कळीत ; दुरुस्ती कामासाठी सहा तास उपसा बंद

गळती सुरू असलेल्या पाईपलाईनची दुरुस्ती तसेच वीजपुरवठा तांत्रिक देखभाल दुरुस्तीसाठी येत्या शनिवारी (3 एप्रिल) सहा तास मुळा धरणातून पाणी उपसा बंद केला जाणार आहे.

अनुराधाताई पौडवाल यांना शिंगणापूर व बेलापूर भेटीचे निमंत्रण
वीजपंप चोरणारे आरोपी अटकेत
भाजप- राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा तुफान राडा ; पोलीस अधिकारी जखमी !

अहमदनगर/प्रतिनिधी-गळती सुरू असलेल्या पाईपलाईनची दुरुस्ती तसेच वीजपुरवठा तांत्रिक देखभाल दुरुस्तीसाठी येत्या शनिवारी (3 एप्रिल) सहा तास मुळा धरणातून पाणी उपसा बंद केला जाणार आहे. त्यामुळे रविवारपासून किमान दोन ते तीन दिवस शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. 

अहमदनगर शहरास पाणीपुरवठा करणारी नवीन मुख्य 1900 एम.एम. व जुनी 700 एम.एम. जलवाहिनी नांदगाव शिवारात पुराणिक वस्तीजवळ लिक झाली आहे. या गळतीच्या ठिकाणी दुरुस्ती कामासह महावितरण कंपनीकडून 33 के.व्ही. मुळा डॅम वाहिनीच्या तातडीच्या तांत्रिक देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे शनिवारी (3 एप्रिल) सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाणी योजनेचा वीज पुरवठा शट डाउन घेण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात मुळानगर व विळद येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार असल्याने शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता येणार नाही. त्यामुळे शनिवारी बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर तसेच स्टेशन रोड, विनायकनगर, केडगाव, नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसर भागास तसेच या दिवशी सकाळी 11 नंतरच्या पाणी वाटपाच्या भागास पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. या भागास पाणीपुरवठा रविवारी (4 एप्रिल) करण्यात येणार आहे.

तसेच रविवारी पाणीपुरवठा वेळापत्रकानुसार (रोटेशन) पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास

म्हणजेच मंगलगेट, रामचंद्र खुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान

गल्ली, धरती चौक, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील

हडको, प्रेमदान हडको, म्युनिसिपल हाडको, सावेडी, सारसनगर, बुरुडगावरोड या भागातील

पाणीपुरवठा हा रविवारऐवजी सोमवारी (दि.5) तसेच सोमवारी पाणीपुरवठा होवू घातलेल्या सर्जेपुरा, तोफखाना, सिध्दार्थनगर, लालटाको, दिल्ली गेट, नालेगाव, चितळे रोड, खिस्तगल्ली, माळीवाडा, बालिकाश्रमरोड परिसर, सारसनगर, बुरुडगावरोड परिसर व सावेडी इत्यादी भागात मंगळवारी

(दि. 6) पाणीपुरवठा करण्यात येईल. शहरातील पाणीपुरवठा एक दिवस बंद करून उपनगरात ज्या भागात जास्त दिवसाचे रोटेशन आलेले आहे, अशा भागात पाणीपुरवठा करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करून महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS