नऊ निलंबित पोलीस पुन्हा झाले सेवेत रुजू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नऊ निलंबित पोलीस पुन्हा झाले सेवेत रुजू

अहमदनगर/प्रतिनिधी : अहमदनगर पोलिस दलातून निलंबित करण्यात आलेल्या नऊ पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना पुन्हा सेवेत हजर होण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक

निळवंडे कालव्यांच्या कामांसाठी चक्का जाम आंदोलन
त्रिवेणीश्‍वर येथे श्रीराम कथा सोहळयास भाविकांची मांदियाळी
साई गाव पालखी सोहळ्यासाठी वाहनांची नोंद करण्याचे आवाहन

अहमदनगर/प्रतिनिधी : अहमदनगर पोलिस दलातून निलंबित करण्यात आलेल्या नऊ पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना पुन्हा सेवेत हजर होण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिले आहेत. यामध्ये पोलिस नाईक रविंद्र भाऊसाहेब कर्डिले यांना शिर्डी येथील साई मंदीर परिसरात हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय पोलिस नाईक बाबुराव भास्कर देशमुख यांना पोलीस मुख्यालय, पोलिस नाईक सोमनाथ अशोक कुंढारे यांना पोलीस मुख्यालय, पोलिस हवालदार बार्शीकर विलास काळे यांना पोलिस मुख्यालय, पोलिस उपनिरीक्षक भैयासाहेब अशोक देशमुख यांना पोलिस नियंत्रण कक्ष, सहाय्यक फौजदार मैनुद्दीन ईस्माईल शेख यांना अकोले पोलिस स्टेशन, पोलिस नाईक अंबादास विश्‍वास पालवे यांना मोटर परिवहन विभाग, पोलिस कॉन्स्टेबल शिवाजी सुभाष कानडे यांना शिर्डी साई मंदीर तर पोलिस कॉन्स्टेबल भाऊसाहेब दगडू आघाव यांना पोलिस मुख्यालय येथे हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, या पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांची निलंबनातून मुक्तता ही तात्पुरत्या स्वरुपाची असून भविष्यात या सर्वच संबंधितांविरुध्द करण्यात येणार्‍या कारवाईस कुठलीही बाधा होणार नाही, असे या आदेशात म्हटले आहे.

COMMENTS