नंबर प्लेट नसणार्‍या दुचाकी पोलिसांचे टार्गेट

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नंबर प्लेट नसणार्‍या दुचाकी पोलिसांचे टार्गेट

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर जिल्ह्यात दुचाकी वाहनांची तपासणी पोलिसांनी सुरू केली आहे. गाडीवर नंबर नसणे, गाडीची कागदपत्र नसणे तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या न

नेवाशातील अल अमीन उर्दू हायस्कूलचा 100 टक्के निकाल
प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
Ahmednagar : अहमदनगर मधून फाईव्ह जी मोबाईल टॉवरला विरोध | LokNews24

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर जिल्ह्यात दुचाकी वाहनांची तपासणी पोलिसांनी सुरू केली आहे. गाडीवर नंबर नसणे, गाडीची कागदपत्र नसणे तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या नंबर प्लेट असलेल्या गाड्यांवर धडक कारवाई करावी, असे आदेश देण्यात आले होते. त्याची अंमलबजावणी नगर जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आली आहे. नाशिक परिक्षेत्र विभागाचे पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांच्या आदेशानंतर नगर जिल्ह्यामध्ये दुचाकी वाहनांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली असून अनेक वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. नगर शहरामधील कोतवाली तसेच तोफखाना हद्दीमध्ये दुचाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली. साधारणतः दीडशेहून अधिक वाहनांवर दंडात्मक कारवाई केलेली आहे. अनेक गाड्यांवर नंबर प्लेट नसल्यामुळे त्यांच्यावरसुद्धा कारवाई करण्यात आली. कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक वाहन जप्त करण्यात आले. अशा प्रकारची कारवाई नगर शहरासह जिल्ह्यामध्ये सर्वत्र सुरू करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अनेक चोरीची वाहने सुद्धा पकडली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

COMMENTS