दोन मुस्लिम भावांनी  हिंदूवर केले अंत्यसंस्कार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दोन मुस्लिम भावांनी हिंदूवर केले अंत्यसंस्कार

मोघुलैया नावाच्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

लस, इंजेक्शन व ऑक्सिजन…जिल्ह्यात खडखडाट ; आरोग्य सेवा कोलमडण्याच्या स्थितीत
न्यू आर्ट्स महाविद्यालयात शैक्षणिक धोरणाविषयी कार्यशाळा उत्साहात
नियमबाह्य रीतीने चालविण्यात येत असलेले  दारूचे दुकान तात्काळ बंद करा

हैदराबादः मोघुलैया नावाच्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. संसर्गाच्या भीतीने त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास किंवा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यास त्यांच्या कुटुंबीयांनी नकार दिला. अशावेळी मोघुलैया यांच्याशी कोणतेही रक्ताचे नाते नसणारे शफी आणि अली हे अ‍ॅम्ब्युलन्स चालवणारे दोन भाऊ पुढे आले. त्यांनी भानसुवाडा इथल्या हिंदू स्मशानभूमीत हिंदू धर्माच्या रीतीरिवाजानुसार मोघुलैया यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार केले. जात,धर्म बाजूला ठेवून अशा कठीण परिस्थितीत धोका पत्करून माणुसकीचे दर्शन घडवणार्‍या शफी आणि अली यांच्या या कृत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

COMMENTS