दोन दिवस आधीच मॉन्सून महाराष्ट्रात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दोन दिवस आधीच मॉन्सून महाराष्ट्रात

दोन दिवस आधीच मॉन्सून महाराष्ट्रात दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. रत्नागिरीच्या हर्णे येथे शनिवारी मॉन्सून दाखल झाला आहे.

मुख्यमंत्री उद्धवजी, बेताल वक्तव्य करणाऱ्या संजय गायकवाडांवर कारवाई कधी करणार ? lLokNews24
राज्यभरातून होणाऱ्या विरोधानंतर अब्दुल सत्तारांची माफी
इंदापूरात गोळी झाडून एकाची हत्या

पुणे/प्रतिनिधीः दोन दिवस आधीच मॉन्सून महाराष्ट्रात दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. रत्नागिरीच्या हर्णे येथे शनिवारी मॉन्सून दाखल झाला आहे. येथून पुढे राज्यात प्रवास सुरू होईल. पुढील काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्राला मॉन्सून व्यापून टाकणार आहे. 

राज्यातील हवामानाची परिस्थिती मॉन्सूनच्या पुढील वाटचालीस अनुकूल असल्याचे हवामान विभागाने सांगितले, हर्णेपर्यंत पोहचलेला मॉन्सून नंतर दक्षिण मध्य महाराष्ट्रात सोलापूरपर्यंत, मराठवाडयासह काही सलग्न भागात पोहचून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे. मॉन्सून संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू व्यापून पुढे कर्नाटकच्या संपूर्ण किनारपट्टीसह निम्म्या कर्नाटकात आणि रायलसीमाच्या काही भागात दाखल झाला. केरळनंतर कर्नाटक किनारपट्टीवर कारवारपर्यंत मॉन्सून पोहोचला होता. त्यानंतर गोव्यासह कर्नाटकचा उर्वरित अंतर्गत भाग व्यापून आंध्र प्रदेश, तेलंगण आणि दक्षिण कोकणासह महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवरील काही जिल्ह्यातही मॉन्सून दाखल झाला आहे. जूनच्या मध्यापर्यंत मॉन्सूनच्या प्रगतीमुळे संपूर्ण महाराष्ट्र, दक्षिण गुजरात, मध्य आणि दक्षिण मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि दक्षिण ओडिशाचा काही भाग व्यापला जाईल. इतकेच नाहीतर हिमालयीय पश्‍चिम बंगालमध्येही मॉन्सूनचा पाऊस पडेल. जुलैच्या मध्यापर्यंत मॉन्सून संपूर्ण देशात हजेरी लावेल. उत्तर-पश्‍चिम (वायव्य) भारतात आणि दक्षिण द्वीपकल्प येथे नैऋत्य मोसमी वार्‍यांची स्थिती सर्वसाधारण राहणार आहे. भारतात ईशान्य आणि मध्य भागात सामान्यपेक्षा कमी हंगामी पाऊस असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे दरम्यान, हवामान खात्याच्या सुधारित अंदाजनुसार,2021 मध्ये देशात मॉन्सून हंगामात (जुन ते सप्टेंबर) सरासरीच्या 101 टक्के पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. प्रशांत महासागरातील स्थिती जैसे थे (तटस्थ) राहणार असून इंडियन ओशन डायपोल (आयओडी) निगेटिव्ह राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

COMMENTS