दोन दशकांत प्रथमच इंधनाच्या खपात घट

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दोन दशकांत प्रथमच इंधनाच्या खपात घट

गेल्या दोन महिन्यांपूर्वी इंंधनाचा वापर वाढला होता; परंतु एक वर्षाचा विचार केला, तर संपूर्ण आर्थिक वर्षात पेट्रोलियम पदार्थांचा वापर वीस वर्षांत प्रथमच 9.1 टक्कयांनी घसरला.

काँग्रेस नेते पवन खेरांना जामीन मंजूर
पुढील 15 दिवसांत स्वगृही परतणार ः एकनाथ खडसे
बेलापूरकरांनी केलेल्या कौतुकामुळे आम्हालाही काम करण्यास निश्चितच ऊर्जा मिळेल; अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे

मुंबई/प्रतिनिधीः गेल्या दोन महिन्यांपूर्वी इंंधनाचा वापर वाढला होता; परंतु एक वर्षाचा विचार केला, तर संपूर्ण आर्थिक वर्षात पेट्रोलियम पदार्थांचा वापर वीस वर्षांत प्रथमच 9.1 टक्कयांनी घसरला. डिझेलच्या खपात 12 टक्के घट झाली. कोरोनाची भीती आणि सक्तीची टाळेबंदी यामुळे इंधनाचा वापर कमी झाला. 

आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये पेट्रोलियम उत्पादनांचा एकूण वापर 194. 63 दशलक्ष टन राहिला. त्याच्या मागच्या वर्षी हाच खप 214.12 दशलक्ष टन होता. याचा अर्थ सुमारे वीस दशलक्ष टनांनी खप कमी झाला. सरकारने शुक्रवारी ही माहिती दिली. इंधनाच्या वापरामध्ये इतकी मोठी घसरण 1998-99 दरम्यान झाली होती. त्यानंतर प्रथमच हे घडले. देशात डिझेल-पेट्रोलचा वापर कमी झाला. देशात सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या इंधनात डिझेलचा वापर सर्वांत कमी झाला. संपूर्ण आर्थिक वर्षात डिझेलचा वापर 12 टक्क्यांनी घसरला आणि 72. इ72 दशलक्ष टनांवर आला, तर पेट्रोलची मागणी 6.7 टक्क्यांनी घसरून 27.95 दशलक्ष टनांवर आली. या काळात घरगुती गॅसच्या खपावर नकारात्मक परिणाम झाला नाही. उलट खप वाढला. घरगुती गॅसच्या खपात 4.7 टक्के वाढ झाली. 26.68 दशलक्ष टनांवरून हा खप 27.59  दशलक्ष टनांवर गेला. गेल्या मार्चच्या शेवटी टाळेबंदी लागू झाली. देशव्यापी टाळेबंदीत कारखान्यांसह इतर सर्व व्यवसाय ठप्प झाले. याव्यतिरिक्त, जवळपास सर्व प्रकारची वाहतूक, गाड्या आणि विमान उड्डाणे थांबविण्यात आली. तीन महिने सारा देश ठप्प झाला होता. जूनपासून अनलॉक प्रक्रियेचा एक भाग म्हणून सरकारने अनेक सवलती दिल्या; परंतु तोपर्यंत देशाच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला. आर्थिक परिस्थितीदेखील खालावली. पहिल्या तिमाहीत जीडीपीत ऐतिहासिक 23.9 टक्के घट झाली. संपूर्ण आर्थिक वर्षात ही घट सात-आठ टक्क्यांपर्यंत कमी होणे अपेक्षित आहे. त्याच वेळी, कोरोनाची दुसरी लाट पुन्हा एकदा देशाच्या आर्थिक पुनर्प्राप्तीस धक्का देऊ शकते. 

मार्चमध्ये चांगली मागणी

या वर्षी मार्च दरम्यान इंधनाची मागणी चांगली आहे. कारण गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनामुळे परिस्थिती चांगली नव्हती. आकडेवारीनुसार, मार्च 2021 मध्ये इंधनाची मागणी 18 टक्क्यांनी वाढून ती 18.77 दशलक्ष टनांवर गेली. यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत पेट्रोलच्या वापरामध्ये 25.7 टक्के आणि डिझेलच्या वापरात 27 टक्के वाढ झाली आहे. 

COMMENTS