देश हुकुमशाहीच्या उंबरठयावर: अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देश हुकुमशाहीच्या उंबरठयावर: अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

अकोला : केंद्राकडून राज्यांच्या अधिकारांवर अतिक्रमण होत असल्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचे वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंब

सोनिया गांधींची प्रकृती बिघडली
सक्ती नाही, पण मास्क वापरा : राज्य सरकारचं आवाहन | DAINIK LOKMNTHAN
केंद्र शासनामार्फत दिले जाणारे राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर

अकोला : केंद्राकडून राज्यांच्या अधिकारांवर अतिक्रमण होत असल्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचे वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्वागत केले असून, देश हुकुमशाहीच्या उंबरठयावर असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आंबेडकर यांनी अकोला येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देश हुकुमशाहीच्या वाटेवर असल्याचे मत मांडले.
संघराज्य पद्धतीचा भंग करण्याचे काम केंद्राकडून होत असल्याच्या उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘हे जुनेच आहे, पण आता सगळ्यांना त्याची जाणीव व्हायला लागली आहे. संविधान बदलणार, नवीन संविधान आले, तर हुकुमशाही येण्याची शक्यता आहे. त्या हुकुमशाहीला आपण तोंड देऊ शकणार नाही. म्हणून ते आता आपापल्या मतदारांना सांगत आहेत.’ आता हे पक्ष आपल्या मतदारांना आपण संविधानवादी झालं पाहिजे, असं सांगत आहेत. ही फार चांगली गोष्ट आहे. स्वागतार्ह आहे. देश हुकुमशाहीच्या उंबरठ्यावर आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये अशा काही घटना घडताना दिसतील की, ज्या तुम्हाला आश्‍चर्यकारक वाटतील, अशी परिस्थिती आहे’, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला. मागच्या आठवड्यात महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारच्या विरोधात केलेला बंद तोंडदेखलेपणा आणि देखावा होता. केंद्राने केलेल्या कायद्याचे मूळ काँग्रेस-राष्ट्रवादीने 2005-06 मध्ये केलेल्या कायद्यात असल्याचा दावा आंबेडकर यांनी केला. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण कसे कमी झाले? असा सवालही आंबेडकर यांनी उपस्थित केला.

COMMENTS