नगर प्रतिनिधीशिक्षक हे प्रथम गुरु आहेत.डॉक्टर,पोलीस,शास्त्रज्ञ,अधिकारी,राजकीय,इंजिनिअर असे सर्वच क्षेत्रातील विद्यार्थी घडविण्याचे कार्य शिक्षक करत अ
नगर प्रतिनिधी
शिक्षक हे प्रथम गुरु आहेत.डॉक्टर,पोलीस,शास्त्रज्ञ,अधिकारी,राजकीय,इंजिनिअर असे सर्वच क्षेत्रातील विद्यार्थी घडविण्याचे कार्य शिक्षक करत असतात.ज्ञान दानाचे पवित्र कार्य करीत आहेत. देशाच्या विकासात व जडणघडणीत शिक्षकांचे योगदान आहे.असे प्रतिपादन स्वकुळसाळी हितसंवर्धक मंडळाचे विश्वस्त प्रमुख अरविंद धिरडे यांनी केले.
स्वकुळसाळी हितसंवर्धक मंडळाचे,श्री लक्ष्मीनारायण शिशु शिक्षण मंदिर संचलित,संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेत शिक्षकदिन उत्साहाने साजरा करण्यात आला.याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षकांचा सत्कार संस्थेच्यावतीने करण्यात आला.याप्रसंगी स्वकुळसाळी हितसंवर्धक मंडळाचे विश्वस्त प्रमुख अरविंद धिरडे बोलत होते.
याप्रसंगी संस्थेचे खजिनदार कृष्णा बागडे,सचिव गजेंद्र सोनवणे,शिक्षण समितीचे चेअरमन जितेंद्र लांडगे,शालेय समितीचे सचिव सुनील पावले,निमंत्रित सदस्य संजय सागांवकर,विक्रम पाठक,स्वकुळसाळी समाजाचे जिल्हाध्यक्ष गणेश अष्टेकर, बाबासाहेब वैद्य,जिव्हेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश झिंजे,योगेश भागवत,शक्ती गोहेल,सुरेखा शेकटकर,छाया साळी, वनिता पाटेकर,शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कल्पना भामरे,शिक्षक जगन्नाथ कांबळे,राजेंद्र गर्जे,सुशीलकुमार आंधळे,शुभदा भांबरे,मीनाक्षी पठारे आदींसह स्वकुळसाळी समाज बांधव उपस्थित होते.
या कार्यक्रमात सुरुवातीला आदर्श शिक्षक डॉ .सर्वपल्ली राधाकृष्णनन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.शाळेतील शिक्षक राजेंद्र गर्जे यांना ”अबॅकस बेस्ट टीचर अवॉर्ड” तर श्रीमती कल्पना भामरे यांना ”योग्य विद्या भूषण” पुरस्कार मिळाल्याने त्यांचा संस्थेतर्फे विशेष सत्कार करण्यात आला.
प्रास्तविकात कृष्णा बागडे म्हणाले कि,शाळेची १९६० पासून वाटचाल सुरु आहे.शाळेच्या प्रगतीसाठी संस्था नेहमीच प्रयत्नशील आहे.सर्वसामान्य शिक्षक देशाचा उपराष्ट्रपती व आदर्श शिक्षक होऊ शकतो.हे दाखवून दिले आहे.प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्याचे कार्य शिक्षक करत असतात.
स्वकुळसाळी समाजाचे जिल्हाध्यक्ष गणेश अष्टेकर म्हणाले कि,सत्कार म्हणजे शिक्षकांनी केलेल्या सत कार्याचा सत्कार होय.शिक्षक दिन हा एक दिवस साजरा न करता वर्षभर साजरा व्हावा.पूर्वी शाळा संस्थेच्या नव्हे तर शिक्षकांच्या नावाने ओळखल्या जायच्या कारण ते तळमळीने ज्ञानदानाचे कार्य करीत होते.त्याच पद्धतीने शिक्षकांनी उत्तम कार्य केल्यास आजही शिक्षकांच्या नावानेच शाळेचा परिचय होईल असे सांगितले.
COMMENTS