Homeताज्या बातम्यादेश

देवेंद्र फडणवीसांनंतर आता या भाजप मंत्र्यांनी दिला ‘मी पुन्हा येईन’ चा नारा

देशातील सर्वात मोठं राज्य असणाऱ्या उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणुक अवघ्या काही महिन्यांवर आहे. म्हणून प्रत्येक पक्षाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

शिवसेनेनं बेईमानी करत मुख्यमंत्रिपदाची भूमिका सांगितली आणि भाजपशी युती तोडली
ऐतिहासिक स्वप्नांची राख रांगोळी!
भाजप, केंद्र सरकारचा इडी, सीबीआय, एनसीबीच्या चौकश्या लाऊन सरकार पाडण्याचा प्रयत्न (Video)

देशातील सर्वात मोठं राज्य असणाऱ्या उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणुक अवघ्या काही महिन्यांवर आहे. म्हणून प्रत्येक पक्षाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या राज्यभर झंझावाती दौरा करत आहेत.

उत्तर प्रदेशची सत्ता राखण्याचं मोठं आव्हान योगी आदित्यनाथ यांच्यासमोर आहे. आतापर्यंत कधीच एका मुख्यमंत्र्याला दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशची सत्ता मिळवता आली नाही. म्हणून ही प्रथा संपवण्यासाठी योगी तयारी करत आहेत. एका प्रश्नाला उत्तर देताना योगी म्हणाले की, मी उत्तर प्रदेशचा सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून पुन्हा येणार आहे.

योगी आदित्यनाथ यांच्या या बोलण्याने महाराष्ट्रातील विधानसभा 2019 आठवल्या शिवाय रहाणार नाही. राज्यातील तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन असं म्हणत राज्यातील राजकारण तापवलं होतं. मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीस हे सध्या राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत.

योगी आदित्यनाथ यांच्यसोबतच भाजपसाठी उत्तर प्रदेशची निवडणूक महत्वाची आहे. भाजपने आपली प्रभारींची यादी जाहीर केली आहे. योगी यांच्या समोर सपा, बसपा आणि काॅंग्रेसच्या प्रियंका गांधी यांचं मोठं आव्हान असणार आहे. परिणामी योगी आदित्यनाथ यांचा मी पुन्हा येणार हा दावा किती खरा ठरणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

COMMENTS