दुचाकीस्वारांना लुटणार्‍या दोघांना पकडले ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुचाकीस्वारांना लुटणार्‍या दोघांना पकडले ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अहमदनगर/प्रतिनिधी : रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांना अडवून लुटमार करणार्‍यांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे. शुभम संजय सोमासे

जिवाणू खते व माती,पाणी परीक्षण मूळे शेती क्षेत्रात आमूलाग्र बदल – ना.गडाख
शेवगावच्या बनावट सोने प्रकरणी 160 जणांना नोटिसा ;गोल्ड व्हॅल्युअर व कर्जदारांचा समावेश, म्हणणे मांडण्याचे पोलिसांचे आदेश
दिराने केला भावजयीचा विनयभंग ; नगरच्या बुरुडगाव रोड परिसरातील घटना

अहमदनगर/प्रतिनिधी : रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांना अडवून लुटमार करणार्‍यांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे. शुभम संजय सोमासे (वय 21, रा. भेंडा फॅक्टरी, ता. नेवासा) व अक्षय कल्याण जाधव (वय 23, रा. देवगांव रोड, कुकाणा, ता. नेवासा) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबतची माहिती अशी की, दि.2 जुलैला रात्री मोटार सायकलवरुन कोरडगांव येथे जात असताना रात्री 9 वाजण्याच्या सुमारास फुंदे टाकळी फाट्याचे पुढे आले असता, पाठीमागून एका मोटारसायकलवरुन आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी मोटारसायकल अडवून शिवीगाळ, दमदाटी करुन व चाकूचा धाक दाखवून फिर्यादीचा मोबाईल, कॅमेरा, कॅमेर्‍याची लेन्स, फ्लॅश, मेमरी कार्ड, पेनड्राईव्ह असा एकूण 38 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल बळजबरीने चोरुन नेला होता.
या घटनेबाबत योगश बद्रीनाथ मगर (रा.कोरडगाव, ता. पाथर्डी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास चालू असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना हा गुन्हा केलेल्या आरोपींची माहिती मिळताच त्यांनी पोलीस पथकाला सूचना दिल्या. पथकाने भेंडा (ता.नेवासा) येथे जावून आरोपींच्या वास्तव्याबाबत गोपनीय माहिती घेतली व आरोपीचा शोध घेवून शुभम संजय सोमासे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याबाबत कसून चौकशी केली असता, त्याने हा गुन्हा त्याचा साथीदार अक्षय जाधव (रा. कुकाणा) असा दोघांनी मिळून केला असल्याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेवून अक्षय जाधव याला कुकाणा येथून ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देवू लागले. त्यांना विश्‍वसात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा केला असल्याची कबुली दिली. गुन्ह्यातील चोरलेल्या मुद्देमालापैकी 6 हजार रुपयांचा मोबाईल, 20 हजार रुपयाचा निकॉन कंपनीचा कॅमेरा, 2 हजार रुपये किमतीचा डिजेटेक कंपनीचा फ्लॅश, 1 हजार रुपये किमतीचा सॅन्डीक्स कंपनीचा पेनड्राईव्ह तसेच गुन्ह्यात वापरलेली 40 हजार रुपये किमतीची होंडा शाईन मोटारसायकल (नं. एमएच 17 बीजे 3452) असा एकूण 69 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल काढून दिल्याने तो जप्त करुन आरोपींना मुद्देमालासह पाथर्डी पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. पुढील कार्यवाही पाथर्डी पोलिस करीत आहेत. या आरोपींविरुद्ध यापूर्वी जबरी चोरी, बेकायदेशिररित्या अग्निशस्त्र जवळ बाळगणे, मारामारी यासारखे गुन्हे दाखल आहेत. शुभम सोमासे याच्याविरुध्द नेवासा पोलिस ठाणे व अक्षय जाधव याच्याविरुध्द भिंगार कॅम्प, नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या दोघांना पकडण्याची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकातील पोलिस उपनिरीक्षक गणेश इंगळे, हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय गव्हाणे, पोलिस नाआक सुरेश माळी, विशाल दळवी, शंकर चौधरी, दीपक शिंदे, रवि सोनटक्क्े, कॉन्स्टेबल जालिंदर माने, विनोद मासाळकर, चालक पोलिस नाईक चंद्रकांत कुसळकर आदींनी केली आहे.

COMMENTS