दुकान फोडून लंपास केलेले साडेचार लाखांचे २३ मोबाईल पोलिसांनी दिले दुकानदाराला परत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुकान फोडून लंपास केलेले साडेचार लाखांचे २३ मोबाईल पोलिसांनी दिले दुकानदाराला परत

कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील प्रगती मोबाईल शॉप फोडून चोरट्यांनी मोबाईल लंपास केले होते. कर्जत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होताच

फिनिक्स पुरुष बचत गटाने निसर्गातील पक्ष्यांसाठी उभारले खाद्यपदार्थ घरटे
ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पाडा- पो. नि. दौलतराव जाधव
जामखेड तालुक्यात मनोज जरांगेंचे जल्लोषात स्वागत  

कर्जत : प्रतिनिधी

कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील प्रगती मोबाईल शॉप फोडून चोरट्यांनी मोबाईल लंपास केले होते. कर्जत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होताच पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पोलिसांची पथके तयार करून ठीकठिकाणी सापळे लावले. पोलिसांनी ३ दिवसांच्या आतच चोरट्यांचा तपास लावला.

३ आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली. एक जण फरार होता. पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे साडेचार लाख रुपये किमतीचे २३ मोबाईल जप्त केले होते. न्यायालयीन प्रक्रियेनंतर मोबाईल शॉपचे संचालक प्रमोद चव्हाण यांच्याकडे हे मोबाईल सुपूर्त करण्यात आले. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने व पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

COMMENTS