दीपाली चव्हाणच्या गर्भपातप्रकरणी  शिवकुमार यांच्याविरोधात गुन्हा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दीपाली चव्हाणच्या गर्भपातप्रकरणी शिवकुमार यांच्याविरोधात गुन्हा

वनाधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असताना आता त्यांच्या गर्भपात केल्या प्रकरणी विनोद शिवकुमार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छत्रपती शिवरायांचे व्यक्तिमत्व आजही प्रेरणादायी – आकाश वडघुले
मुंबईतील 7 रेल्वे स्थानकांची नावे बदलणार
आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र

अमरावती /प्रतिनिधीः वनाधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असताना आता त्यांच्या गर्भपात केल्या प्रकरणी विनोद शिवकुमार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अमरावतीतील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणार्‍या हरीसाल क्षेत्रात कार्यरत  परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी 25 मार्च रोजी शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केली. 

या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार यांच्यावर दीपालीने मृत्यपूर्वी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये गंभीर आरोप करत आत्महत्येला जबाबदार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे 25 मार्च रोजीच विनोद शिवकुमार यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. धारणी पोलिस वेगाने तपास करत आहे. शिवकुमार याने दीपालीला जंगलात फिरवल्याने तिचा गर्भपात झाला, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

COMMENTS