देवळाली प्रवरा /राजेंद्र उंडे करवीरचे पोलीस उपअधीक्षक राजाराम रामराव पाटील हे आज पोलीस सेवेतून निवृत्त झाले आहेत. ते दिवंगत माजी गृहमंत्री
देवळाली प्रवरा /राजेंद्र उंडे
करवीरचे पोलीस उपअधीक्षक राजाराम रामराव पाटील हे आज पोलीस सेवेतून निवृत्त झाले आहेत. ते दिवंगत माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आर आर पाटील यांचे सख्खे बंधू आहेत. दोनच दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात कागल मधील मुरगूड येथे जात शेकडो कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपाचे पुरावे दिले होते.
मुरगूड हे मुश्रीफ यांच्या मतदारसंघात येते. त्यामुळे सोमय्या यांना विरोध करण्यासाठी समर्थक गोंधळ घालण्याची शक्यता होती. मात्र अशा तणावाच्या स्थितीत चोख पोलीस बंदोबस्त ठेवून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी राजाराम पाटील यांनी खास दक्षता घेतली होती. किरीट सोमय्या यांची तक्रार मुरगूड पोलीस स्टेशनमध्ये राजाराम पाटील यांनीच स्वीकारली होती.
दरम्यान, सख्खे बंधू महत्वाचे मंत्री होते, वहिनी आता आमदार आहेत, घरी देखील राजकीय पार्श्वभूमी आहे अशातही कोणताही मग्रूरपणा न आणता राजाराम म्हणजेच तात्या यांनी आपले कर्तव्य बजावले. तर, पोलीस सेवेतील अखेरच्या दिवशी कर्तव्यावर जाताना त्यांनी आपल्या मातेला सॅल्युट करुन, कृतज्ञता व्यक्त केली. पाटील यांना निष्ठा आणि कामातील तत्परतेसाठी दोनवेळा राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आलं आहे.
COMMENTS