दिराने केला भावजयीचा विनयभंग ; नगरच्या बुरुडगाव रोड परिसरातील घटना

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिराने केला भावजयीचा विनयभंग ; नगरच्या बुरुडगाव रोड परिसरातील घटना

अहमदनगर/प्रतिनिधी- पिण्यासाठी पाणी देणार्‍या 22 वर्षीय भावजयीचा हात धरुन व तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन तिच्या दिराने तिचा विनयभंग केला.ही

अहमदनगर मनपा सभागृह नेतेपदी अशोक बडे यांची नियुक्ती
विना परवाना रस्ता खोदणार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल ; महापालिकेची कारवाई
साखर उद्योगात फुले 265 वाणाचे समज आणि गैरसमज

अहमदनगर/प्रतिनिधी- पिण्यासाठी पाणी देणार्‍या 22 वर्षीय भावजयीचा हात धरुन व तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन तिच्या दिराने तिचा विनयभंग केला.ही घटना बुरुडगाव रोडवरील भोसले आखाडा परिसरात शनिवारी (दिनांक 8) घडली. याबाबतची माहिती अशी की केडगाव परिसरात राहणारी 22 वर्षीय महिला तिच्या सासू-सासर्‍यांच्या घरी बुरुडगाव रोडवरील भोसले आखाडा परिसरात आलेली असताना ती घरात एकटी असल्याचे पाहून व तिचा पती दुकानात गेल्याचे पाहून तिच्या दिराने तिला पिण्यासाठी पाणी मागितले. यावर ती महिला दिराला पाणी देत असताना त्याने तिचा हात पकडून व हाताचे बोट तोंडात घेऊन तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन तिचा विनयभंग केला. तिने प्रतिकार केला असता दिराने तिचा उजवा हात पिरगाळून तिला शिवीगाळ केली व तोंडावर मारले. तेव्हा त्या महिलेने आरडाओरडा केला. त्या आवाजाने तिचा पती पळत आला. त्याला पाहताच तिच्या दिराने त्याला आरशाच्या काचेने मारले. काच मारल्याने तिचा पती जखमी झाला. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी त्या महिलेच्या फिर्यादीवरुन दिराविरुद्ध विनयभंग केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलिस हवालदार देवराम ढगे करीत आहेत.

COMMENTS