नेवासा(प्रतिनिधी) शंख घंटा व चौघडयाचा निनाद... दिगंबरा..श्रीपाद वल्लभ.. दिगंबरा..चा जयघोष फटाक्यांची आतषबाजी करत गुरुवारी नेवासा तालुक्यातील भू-लो
नेवासा(प्रतिनिधी)
शंख घंटा व चौघडयाचा निनाद… दिगंबरा..श्रीपाद वल्लभ.. दिगंबरा..चा जयघोष फटाक्यांची आतषबाजी करत गुरुवारी नेवासा तालुक्यातील भू-लोकीचा स्वर्ग अशी ओळख असलेल्या श्री क्षेत्र देवगड येथे महंत गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या हस्ते भगवान दत्तात्रयांचे मंदीर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले.यावेळी भाविकांच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह दिसून येत होता.
कोरोनाच्या काळात शासनाच्या आदेशानुसार राज्यातील सर्वच मंदिरे बंद करण्यात आली होती एकीकडे कोरोनाचे संकट…माणसामध्ये असलेली कोरोनाची भीती दडपण अशी भयावह परिस्थिती असतांना दडपण कमी करण्यासाठी देवाचे द्वार ही बंद यामुळे सर्वसामान्य नागरिक भाविकांची मोठी घुसमट झालेली दिसत होती मात्र सरकारने दि.७ ऑक्टोबर रोजी नियमांचे पालन करत मंदिर उघडण्याचे आदेश दिल्याने
भक्तांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला
यानिमित्ताने पहाटेच्या सुमारास वेदमंत्राच्या जयघोषात गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या हस्ते भगवान दत्तात्रयासह श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा,पंचमुखी सिद्धेश्वर, भगवान गणेश व कार्तिक स्वामी यांच्या मूर्तीस अभिषेक घालण्यात आला.पहाटे पासूनच भक्तांची दत्त दर्शनासाठी सामाजिक अंतराचे पालन करत रांगा लागल्या होत्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांना सॅनिटायझर हातावर शिंपडून आत प्रवेश दिला जात होता.,
घटस्थापनाच्या मुहूर्तावर शासनाने परवानगी दिली. त्यामुळे सर्व संत महंतांसह भक्तांमध्ये उत्साह दिसून येत होता यानिमित्ताने गुरुवारी दि.७ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास वेदमंत्राचा जयघोष करत गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या हस्ते भगवान दत्तात्रयांच्या मंदिराचे कुलूप उघडण्यात येऊन भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात आले.
शासन नियमांचे पालन व्हावे म्हणून गुरुवर्य भास्करगिरी बाबांनी भक्तांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नियमावली जाहीर केली याबाबत बोलतांना ते म्हणाले की दर्शनासाठी येतांना भाविकांनी प्रवेशद्वाराजवळ असलेल्या नळाजवळ हातपाय स्वच्छ धुवून शुचिर्भूत होऊन मंदिरात प्रवेश करावा,दर्शन रांगेत तीन फुटाचे अंतर ठेवावे,चेहऱ्यावर मुखपट्टी आवश्यक असून मंदिरात दर्शनासाठी जाण्याच्या अगोदर भाविकांच्या हातावर सॅनिटायझर मारून मंदिरात प्रवेश दिला जाईल, यामध्ये शासन नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाईल यासाठी भाविकांनी देखील नियमांचे पालन करावे असे आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केले.
COMMENTS