देवळाली प्रवरा /प्रतिनिधी गुहा ता.राहुरी येथिल एका तीस वर्षिय महिला पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास जाण्यापुर्वीच राहुरी येथिल भुमिअभिलेख कार्यालया
देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
गुहा ता.राहुरी येथिल एका तीस वर्षिय महिला पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास जाण्यापुर्वीच राहुरी येथिल भुमिअभिलेख कार्यालयाच्या प्रवेशद्वारात ‘त्या’ दोन तरुणांबरोबर झालेल्या वादातून विषारी औषध घेवून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.हा सर्व प्रकार नाजुक संबधनातून घडला असल्याची चर्चा आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, सोमवारी दुपारी 12 वाजता गुहा ता.राहुरी येथिल 30 वर्षिय महिला भुमिअभिलेख कार्यालयाच्या प्रवेशद्वारा समोर त्या दोन तरुणांना भेटली.त्यांच्यात वाद झाले.तिने पोलीसात फिर्याद दाखल करणार असल्याचे सांगितले.त्यावरुन वाद आणखी पेटला त्या तरुणीने भुमिअभिलेख कार्यालयाच्या प्रवेशद्वारात सोबत आणलेली विषारी औषधाची बाटली काढून त्या तरुणांच्या समोर सेवन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला.त्या तरुणीस तातडीने राहुरी फँक्टरी येथिल विवेकानंद नर्सिंग होम मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले.
हि तरुणी भुमिअभिलेख प्रवेशद्वारात त्या तरुणां बरोबर वाद का घालीत होती.ती तरुणी कोणाच्या विरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करणार होती.हे माञ समजू शकले नाही. त्या तरुणी बरोबर वाद घालणारे ते दोन तरुण कोण होते?असे अनेक प्रश्न समोर येत असले तरी त्या तरुणीच्या जबाबा वरुनच खरी माहिती पुढे येणार आहे.विवेकानंद नर्सिंग होमच्या वैद्यकीय सुञांनी विषारी औषध सेवन केल्याची माहिती राहुरी पोलीस ठाण्यात कळविली आहे. सायंकाळ पर्यंत राहुरी पोलीस ठाण्यातुन एक पोलीस त्या महिलेचा जबाब घेण्यासाठी आलेला नव्हता. त्या तरुणीने नाजुक कारणातून विषारी औषध सेवन केल्याची चर्चा तालुक्यात सुरु आहे.
COMMENTS