त्या आरोपीला बालन्यायालयापुढेच हजर करा… कर्जतच्या प्रकरणात खंडपीठाने दिला तूर्तातूर्त अटकपूर्व जामीन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

त्या आरोपीला बालन्यायालयापुढेच हजर करा… कर्जतच्या प्रकरणात खंडपीठाने दिला तूर्तातूर्त अटकपूर्व जामीन

अहमदनगर/प्रतिनिधी- अल्पवयीन आरोपीने अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवल्याने ती गर्भवती झाल्याच्या कर्जत तालुक्यातील चर्चेत असलेल्या प्रकरणातील आरोपील

स्वातंत्र्यदिनापासून रात्री 10 पर्यंत स्वातंत्र्य…करा मजा…; नगर जिल्ह्यातील लॉकडाऊन अखेर शिथील, मंदिरे व सिनेमागृहे मात्र राहणार बंद
साकत शिवारातील पेट्रोल पंपावर दरोडा ; अडीच लाखाचा ऐवज लुटला
Ahmednagar : नगर – कल्याण महामार्गाचे काम सुरु…खा.विखे – आ .जगताप यांनी केली पाहणी | LokNews24

अहमदनगर/प्रतिनिधी- अल्पवयीन आरोपीने अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवल्याने ती गर्भवती झाल्याच्या कर्जत तालुक्यातील चर्चेत असलेल्या प्रकरणातील आरोपीला औरंगाबाद खंडपीठाने तूर्तातूर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे व संबंधित आरोपीला बाल न्यायालयापुढेच हजर करण्याचेही आदेश दिले आहेत.
मागील दीड वर्षापासून गाजत असलेल्या कर्जत तालुक्यातील अल्पवयीन प्रेमीयुगलांच्या प्रकरणाला दिवसेंदिवस वेगवेगळी वळणे मिळत आहेत. श्रीगोंदा जिल्हा सत्र न्यायालयाने सज्ञान म्हणून फेटाळलेला आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठाने तूर्तातूर्त मंजूर केला असून, या गुन्ह्यामधील मुख्य आरोपीला अटक न करता बाल न्यायालयापुढेच पोलिसांनी हजर करावे, असे आदेश दिले आहेत.
याबाबतची माहिती अशी की कर्जत तालुक्यातील नवसरवाडी येथील अल्पवयीन मुलाने कर्जत येथील अल्पवयीन मुलीबरोबर प्रेम संबंधातून पळून जावून 15 जाने 2020 रोजी लग्न केले होते. दि.15 फेब्रु 2020 रोजी हे प्रेमीयुगल पळून गेले व त्यांनी शिरूर येथे संसार थाटला. दरम्यान, अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. या मुलीचा गर्भपात शिरूर येथील डॉ. चोरे यांच्या हॉस्पिटलला करण्यात आला. त्यानंतर, त्या मुलाने 30 डिसेंबर 2020 रोजी त्या मुलीला कर्जतला सोडून तो पळून गेला. ती मुलगी आपल्या आई-वडिलांच्या घरी गेल्यानंतर या अल्पवयीन मुलीने त्या मुलाविरुद्ध जवाब देत पोलिसांकडे आपल्यावर अत्याचार झाल्याची कैफियत मांडली. यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार, पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले. या अल्पवयीन आरोपीने जून 2021 मध्ये अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला. हा अर्ज श्रीगोंदा जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी हा सज्ञान आहे म्हणून फेटाळून लावला. पण, संबंधित आरोपी मुलास सज्ञान असल्याने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावण्याच्या श्रीगोंदा न्यायालयाने दिलेल्या आदेशास संबंधित आरोपीच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये आव्हान देण्यात आले. अ‍ॅड. राहुल कर्पे व अ‍ॅड. आकाश हाळनवर यांच्यामार्फत हा अटकपूर्व जामीनासाठी जुलै 2021 मध्ये अर्ज करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी हा गुन्हा घडते वेळी अल्पवयीन होता, असा युक्तिवाद आरोपीद्वारे खंडपीठापुढे करण्यात आला. त्यामुळे खंडपीठाने जिल्हा सत्र न्यायालयाचा अटकपूर्व जामीन फेटाळण्याचा निर्णय रद्द करून या अल्पवयीन मुलास तूर्तातूर्त अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. तसेच या आदेशानुसार पोलिसांनी या अल्पवयीन मुलास अटक न करता बाल न्यायालयापुढे विधी संघर्षीत बालक म्हणून हजर करावे, असा आदेश दिला आहे.

स्वतंत्र केला तपास
श्रीगोंदा न्यायालयाने आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्याचा निर्णय देताना या गुन्ह्याच्या पोलिसांच्या तापासाबाबत गंभीर आक्षेप नोंदवत तपासी अधिकारी अमरजीत मोरे यांच्यासह पोलिस यंत्रणेवर ताशेरे ओढले होते व या प्रकरणात थेट पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना तपासाचे आदेश दिले होते. त्यानंतर या प्रकरणाचा तपास श्रीगोदा येथील पोलिस निरीक्षक ढिकले यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यांनी या प्रकरणाचा स्वतंत्र तपास करून न्यायालयाच्या आदेशाने डॉ. चोरे यांना आरोपी केले आहे.

COMMENTS