’तौक्ते’ पाठोपाठ आता ’यास’ची भीती

Homeमहाराष्ट्रमुंबई - ठाणे

’तौक्ते’ पाठोपाठ आता ’यास’ची भीती

देशात ’तौत्के’ चक्रीवादळानंतर आता ’यास’ वादळाचा भीती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ’यास’ वादळ भीषण चक्रीवादळात रुपांतरीत होण्याची शक्यता आहे.

सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, मुलाचा फैसला उद्या
एक्स’चा भारतीय यूजर्सना दणका
राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना घेतले ताब्यात

नवी दिल्लीः देशात ’तौत्के’ चक्रीवादळानंतर आता ’यास’ वादळाचा भीती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ’यास’ वादळ भीषण चक्रीवादळात रुपांतरीत होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 26 मे रोजी ’यास’ चक्रीवादळ ओडिशा-पश्‍चिम बंगालच्या समुद्रकिनार्‍यावरुन जाणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे ओडिशाबरोबरच पश्‍चिम बंगालला अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. 

ओडिशा सरकारने 30 मेपासून 14 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. याशिवाय ओडिशा आणि पश्‍चिम बंगालमधील भारतीय नौदल आणि भारतीय तट रक्षक दलालाही दक्ष राहण्यास सांगण्यात आले आहे. हे वादळ 26 मे रोजी ओडिशा आणि पश्‍चिम बंगालच्या किनार्‍यावर धडकू शकते. अशा परिस्थितीत मच्छीमारांना समुद्राच्या तटापासून लांब राहण्याचा सल्ला दिला जातो. यादरम्यान ओडिशाचे मुख्य सचिव एसपी मोहपात्रा यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत परिस्थिती हाताळण्यासाठी आपात्कालिन बैठकीचे आयोजन केले आहे. त्यांनी बैठकीत सांगितले, की राज्य सरकार चक्रीवादळ ’यास’ च्या परिणामांशी दोन हात करण्यास तत्पर आहे. यासाठी बचाव दलाला अलर्ट देण्यात आले आहे. आतापर्यंत हवामान विभागाने चक्रीवादळासंदर्भात शक्यता, मार्ग, वेग, किनार्‍याशी धडकण्याची जागा आदीबाबत माहिती दिलेली नाही. येत्या 72 तासांत भीषण वादळाचा रुप बदलून चक्रीवादळात रुपांतरित झाले तर त्याचे नाव ’यास’ असेल. हे नाव ओमानने दिले आहे. ओमानने स्थानिक स्थानिक बोलीच्या आधारावर हे नाव दिले आहे. यास याचा अर्थ निराश असा होतो. देशाच्या पूर्व किनार्‍यावर 26-27 मे दरम्यान चक्रीवादळाचा परिणाम पाहायला मिळू शकतो.

COMMENTS