तुमचं राजकारण होतं… पण, जीव मात्र सामान्य जनतेचा जातो.. मुख्यमंत्र्यांकडून विरोधकांची कानउघाडणी…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तुमचं राजकारण होतं… पण, जीव मात्र सामान्य जनतेचा जातो.. मुख्यमंत्र्यांकडून विरोधकांची कानउघाडणी…

प्रतिनिधी : मुंबईकरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी ठाकरे सरकारकडून मोठ्या उपाययोजना राबवत आहेत. आज या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृती दलान

सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वावर अजित पवार गटाचा सवाल?
पंतप्रधान एका पक्षाचे नसून देशाचे असतात
भावनिक राजकारणाचे बळी !

प्रतिनिधी : मुंबई
करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी ठाकरे सरकारकडून मोठ्या उपाययोजना राबवत आहेत. आज या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृती दलाने आज ‘माझा डॉक्टर’ ही ऑनलाइन वैद्यकीय परिषद आयोजित केली.

त्यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी तसंच उपस्थित डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातल्या करोना परिस्थितीचा आढावा घेतला आणि जनतेला मार्गदर्शनही केलं. यावेळी त्यांनी विरोधकांनाही निशाण्यावर घेतले.

विरोधकांकडून राज्यातील मंदिरे उघडी करण्याची मागणी केली जात आहे. यासाठी भाजप आणि मनसेने आंदोलनही केले. या पार्श्वभूमीवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षांना खडसावले.

ते म्हणाले, मंदिरे उघडी करण्याच्या मागणीसाठी अनेकांनी आंदोलने केली. तुम्ही आंदोलनं करा, अवश्य करा. पण करोनाविरुद्ध आंदोलन करा. आपल्या राजकारणामुळे जीव मात्र सामान्य जनतेचा जातो. हे चुकीचं आहे. असं व्हायला नको, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यात अनेकजण लवकर अनेक गोष्टी उघडण्याची मागणी करत आहेत. पण ही घाई सर्वसामान्य जनतेच्या अडचणी वाढवणारी, त्यांचे आरोग्य धोक्यात घालणारी तर नाही ना याचा विचार सर्वांनीच केला पाहिजे. अगदी राजकारण्यांनीही,

आम्ही ही हा विचार करायला हवा. राजकारण आपल्या सर्वांचं होतं पण जीव मात्र सामान्य जनतेचा जातो. जनतेच्या जीवाशी खेळू नका, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

COMMENTS