तुकाराम पवार यांची अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध समितीवर निवड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तुकाराम पवार यांची अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध समितीवर निवड

कर्जत : प्रतिनिधी ७ ऑक्टोबर रोजी कर्जत येथे झालेल्या बैठकीमध्ये तुकाराम शाबु पवार यांची कर्जत अनुसूचित जमाती उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीवर न

प्रवीण घुलेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस करणार नगरपंचायतीच्या १७ उमेदवारांची तयारी
तालुक्यातील शेअरधारकांना वेठीस धरल्यास ‘अंबालिका’ सुरू होऊ देणार नाही : महेंद्र धांडे
फक्त पावसावर विसंबून असलेल्या शेतीचे शेतकऱ्यांने केले नंदनवन. वर्षाकाठी काढले ५० लाखाचे उत्पन्न.

कर्जत : प्रतिनिधी

७ ऑक्टोबर रोजी कर्जत येथे झालेल्या बैठकीमध्ये तुकाराम शाबु पवार यांची कर्जत अनुसूचित जमाती उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीवर निवड करण्यात आली आहे. तसे पत्र समितीचे सचिव, कर्जतचे गटविकास अधिकारी अमोल जाधव  व समितीचे अध्यक्ष प्रांताधिकारी अजित थोरबोले यांनी दिले.

तुकाराम पवार हे ग्रामीण विकास केंद्र, जामखेड या संस्थेच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील अनुसूचित जमाती, भटके-विमुक्त, आदिवासी, वंचित समूहाबरोबर गेल्या ६ वर्षांपासून भरीव  काम करीत आहे.  

तालुक्यातील वंचित घटकामधील वाद, तंटे सामोपचाराने सोडवणे, त्यांना नागरिकत्वाचे पुरावे काढून देणे, शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहचवणे व त्याचा लाभ मिळवून देणे, कोरोना काळामध्ये भटके-विमुक्त, आदिवासी समाजाची होणारी उपासमार थांबवण्यासाठी ग्रामीण विकास केंद्र, जामखेड या संस्थेच्या माध्यमातून तुकाराम पवार यांनी कर्जत तालुक्यात भरीव मदत करून या लोकांना उपासमार होण्यापासून वाचवले आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन पवार यांची कर्जत अनुसूचित जमाती उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीवर निवड करण्यात आली आहे.

COMMENTS