तिसर्‍या लाटेत लहान मुलांना अधिक धोका

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तिसर्‍या लाटेत लहान मुलांना अधिक धोका

ऑक्टोबरमध्ये गाठणार उच्चांक राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेचा इशारानवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी, कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्

चोरटयांनी तरुणीच्या बाबतीत केले हे कृत्य ;पाहा व्हिडीओ l
राणा दाम्पत्याचा तुरुंगातला मुक्काम वाढला | DAINIK LOKMNTHAN
कोल्हेंनी कर्तव्यातून कार्यसिद्धीला आपलेसे केले

ऑक्टोबरमध्ये गाठणार उच्चांक राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेचा इशारा
नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी, कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, ऑक्टोबर महिन्यात ही लाट उच्चांक गाठेल असा इशारा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या तज्ज्ञांच्या समितीने दिला आहे. या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना बसू शकतो, असा अंदाज देखील या संस्थेने वर्तवला आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार, या समितीने आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालात म्हटलं आहे की, ज्या प्रमाणात लहान मुलांना कोरोनाची लागण होऊ शकते, त्या प्रमाणात आपल्याकडे आत्ता पुरेशा आरोग्यसुविधा उपलब्ध नाहीत. हा अहवाल पंतप्रधान कार्यालयाकडेही पाठवण्यात आलेला आहे. सहव्याधी असलेल्या तसेच दिव्यांग असलेल्या लहान मुलांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात यावे अशी सूचनाही या अहवालात केलेली आहे. कितीही खबरदारी घेतली तरीही कोरोनाची तिसरी लाट ही ऑक्टोबर अखेरपर्यंत येण्याची शक्यता आहेच, असेही या समितीकडून सांगण्यात आले आहे. लहान मुलांचे लसीकरण अद्याप झालेले नाही, ह्या मुद्द्यावर अनेक तज्ज्ञांसोबत चर्चा करण्यात आली. त्यातून असे लक्षात आले आहे की, लहान मुलांवर कोरोना विषाणूचा अतिगंभीर परिणाम होणार नसला तरीही ह्या मुलांमुळे इतरांमध्ये कोरोनाचा फैलाव होऊ शकतो. तसेच कोरोनाची तिसरी लाट ही इतर दोन लाटांपेक्षा सौम्य स्वरुपाची असेल अशीही माहिती या अहवालाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. त्यादृष्टीने केंद्र सरकारने कोरोनाच्या तिसर्‍या लाटेपूर्वी उपाययोजना सुरू केल्या आहेत.

COMMENTS