तहसीलदार ज्योती देवरे यांच्याविरुद्ध लोकायुक्तांकडे तक्रार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तहसीलदार ज्योती देवरे यांच्याविरुद्ध लोकायुक्तांकडे तक्रार

अहमदनगर: लोकसेवक पदाचा गैरवापर करून वाळूमाफियांना परस्पर कारवाईमुक्त करणे, बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांचे ट्रॅक्टर, डंपर, जेसीबी आणि पोकलेन मशिन जप

एकतर देवरेंची बदली करा, किंवा आमची तरी करा…; पारनेरच्या महसूल कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन
तहसीलदार देवरेंनी केला सहा कोटीचा भ्रष्टाचार?; लोकायुक्तांकडे तक्रार दाखल, सुनावणीकडे लक्ष
तहसीलदार देवरेंना न्याय मिळण्यासाठी सोमवारी काळ्या फिती लावून आंदोलन

अहमदनगर: लोकसेवक पदाचा गैरवापर करून वाळूमाफियांना परस्पर कारवाईमुक्त करणे, बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांचे ट्रॅक्टर, डंपर, जेसीबी आणि पोकलेन मशिन जप्त केल्यानंतर तडजोड शुल्क सरकारला जमा न करता परस्पर मुक्त करणे अशा विविध प्रकारे पारनेर येथील तहसीलदार ज्योती देवरे यांनी पाच कोटी ९४ लाख ९६ हजार ७२ रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार राज्याच्या लोकायुक्तांकडे दाखल करण्यात आली आहे.राहुल झावरे, संदीप चौधरी, ज्ञानेश्वर लंके व सुहास सालके यांनी ऍड. असीम सरोदे,ऍड. अजित देशपांडे आणि ऍड. अक्षय देसाई यांच्यामार्फत ही तक्रार दाखल केली आहे.

COMMENTS