रिझर्व्ह बॅंकचे गव्हर्नर किंवा त्यांची संपुर्ण व्यवस्था देशाची अर्थव्यवस्था मोजण्यात अपयशी होत असेल तर देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे.
मुंबई :रिझर्व्ह बॅंकचे गव्हर्नर किंवा त्यांची संपुर्ण व्यवस्था देशाची अर्थव्यवस्था मोजण्यात अपयशी होत असेल तर देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे.
देशाचा जीडीपी ७.५ मायनसमध्ये गेला ही सत्य परिस्थिती आहे. याचा अर्थ रिझर्व्ह बॅंकेकडून आकलन चुकीचे होत आहे. सरकार पैसे मागतेय तर तुम्ही देताय. रिझर्व्ह बॅंकेला हे कळलं पाहिजे. तुम्ही अंदाज घेत नाही मग देशाची अर्थव्यवस्था कशी चालणार आहे असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे. रिझर्व्ह बॅंकेने कबूल केले आहे हे चांगलं आहे परंतु आकलन चुकत असेल तर हे देशासाठी सारखं सारखं चांगलं राहणार नाही असेही मत नवाब मलिक यांनी मांडले आहे.
COMMENTS