तरुणीचा रुद्रावतार ! एकमेकींना लाथा-बुक्क्यांनी बदडलं .

Homeताज्या बातम्यादेश

तरुणीचा रुद्रावतार ! एकमेकींना लाथा-बुक्क्यांनी बदडलं .

क्षुल्लक वादावरून मारामारी झाल्याचा व्हिडिओ व्हायरल

एका सुरक्षारक्षक महिलेशी झालेल्या क्षुल्लक वादावरून मारामारी झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे . वाराणसी(Varanasi) शहराच्या सुशोभीकरणाचे काम वेगात सुर

नाभिक समाज ट्रस्टतर्फे समाजमित्र, कार्यगौरव पुरस्कारांचे वितरण
निळवंडे येथे केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा उत्साहात
तरूणाच्या डोक्यात कुर्‍हाडीने वार

एका सुरक्षारक्षक महिलेशी झालेल्या क्षुल्लक वादावरून मारामारी झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे . वाराणसी(Varanasi) शहराच्या सुशोभीकरणाचे काम वेगात सुरू आहे . नमो घाटावर(Namo Ghatavar) बांधकाम सुरू असल्याने सर्वसामान्यांच्या ये-जा करण्यावर बंदी आहे . मात्र, एका महाविद्यालयीन विद्यार्थिनी तिच्या काही मैत्रिणींसह मुख्य गेटजवळ आली आणि तिने आत जाण्याचा आग्रह धरला . तिला अडवल्यामुळे तिथे उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांशी झटापट झाली . हे प्रकरण इतके वाढले की, वादाते रूपांतर हाणामारीत झाले आणि तरुणीने महिला सुरक्षा रक्षकालाच मारहाण करण्यास सुरुवात केली . शिवीगाळ आणि मारहाणीमुळे तेथे लोक जमा झाले. उपस्थित कोणीतरी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर अपलोड केला . सध्या हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

COMMENTS