तथागत बुद्धिस्ट सोसायटीने लावले गरीब दांम्पत्याचे लग्न

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तथागत बुद्धिस्ट सोसायटीने लावले गरीब दांम्पत्याचे लग्न

अहमदनगर (प्रतिनिधी)-  तथागत बुद्धिस्ट सोसायटीने गरीब दांम्पत्याचे लग्न जमवले. या दांम्पत्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांचा रेल्वे स्टेश

बियाणे, खते तपासणीसाठी जिल्ह्यात 15 भरारी पथके
उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ
काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ ७ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात. 

अहमदनगर (प्रतिनिधी)- 

तथागत बुद्धिस्ट सोसायटीने गरीब दांम्पत्याचे लग्न जमवले. या दांम्पत्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांचा रेल्वे स्टेशन येथील भीमराज बुद्धविहार येथे संस्थेच्या खर्चाने लग्न लावून देण्यात आले.

तथागत बुद्धिस्ट सोसायटीच्या माध्यमातून बौध्द समाजातील युवक-युवतींना लग्नासाठी योग्य जोडीदार मिळावा या भावनेने   नुकतेच बुध्दिस्ट वधू-वर सुचक केंद्र कार्यान्वीत करण्यात आले आहे. या केंद्राची सुरुवात होण्याअगोदरच संस्थेच्या वतीने गरीब दांम्पत्याचे लग्न लावून देण्यात आले. दिपक गायकवाड आणि वैशाली कदम या वधू-वरांचा विवाह नुकताच पारंपारिक पध्दतीने पार पडला. या दांम्पत्यांना बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे संस्कार सचिव सत्येंद्र तेलतुंबडे यांनी आशीर्वादित केले.

 राष्ट्रसंत गाडगेबाबांनी गोरगरिबांची लग्न लावण्याचा संदेश दिला. तो तथागत बुद्धिस्ट सोसायटीने आचरणात आणला. दीन-दुबळ्यांचे लग्न कार्य पार पाडण्यासाठी संस्था कार्यरत राहणार आहे. तसेच सामुदायिक विवाहाचे नियोजन देखील केले जाणार असल्याचे तथागत बुद्धिस्ट सोसायटाचे अध्यक्ष संजय कांबळे यांनी सांगितले.  

तथागत बुद्धिस्ट सोसायटी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या ध्येय आणि उद्देशाप्रमाणे कार्य करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे लग्न जमवून आणि पालकांचे प्रबोधन करून, लग्न लावून देण्यात आले. संस्थेने वधू-वरांचे पोशाख, सर्व उपस्थित नातेवाईकांना भोजन, संसार उपयोगी साहित्याची मदत केली असल्याचे उपाध्यक्ष दिपक अमृत यांनी माहिती दिली. हा लग्न सोहळा पार पाडण्यासाठी केंद्रीय शिक्षक अण्णासाहेब गायकवाड, किशोर कांबळे, मिलिंद आंग्रे, संतोष गायकवाड, रंगनाथ माळवे, शिवाजी भोसले, विशाल कांबळे, अमोल गायकवाड, नितिन साळवे यांनी परिश्रम घेतले. केंद्रीय शिक्षक प्रकाश कांबळे यांनी मंगल परिणय संस्कार विधी केला. याप्रसंगी बुद्ध विहार समन्वय समितीचे धोंडिबा राक्षे, उज्वला गायकवाड, पद्मा कांबळे,  रोहित तेलतुंबडे आदी उपस्थित होते. संस्थेच्या या सेवाभावी कार्याबद्दल बौद्धाचार्यांनी कौतुक केले.

COMMENTS